Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 07:57 AM2021-09-25T07:57:23+5:302021-09-25T08:00:46+5:30

आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे.

aditya birla sun life amc eyes rs 20500 cr valuation in rs 2768 cr ipo to opens 29 september | Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

Next
ठळक मुद्देकंपनी २७६८ कोटींचा निधी उभारणारकंपनीकडे एकूण ११२ म्युच्युअल फंडांच्या योजना समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय

मुंबई: सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी मोठी पर्वणी ठरल्याचे सांगितले जात आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे हजारो गुंतवणूकदारांना घसघसशीत लाभ झाला असून, गुंतवणुकीच्या अनेकविध संधी IPO च्या माध्यमातून खुल्या होत आहेत. यातच आता वित्तीय सेवा क्षेत्रातील एका कंपनीने आयपीओ जाहीर केला आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. (aditya birla sun life amc eyes rs 20500 cr valuation in rs 2768 cr ipo to opens 29 september)

अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी

अलीकडेच हॉटेल क्षेत्रातील OYO कंपनीने तब्बल १ अब्ज डॉलरचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड कंपनीकडून २९ सप्टेंबर २०२१ रोजी आपली इनिशियल पब्लिक ऑफरिंग खुली करणार आहे. या ऑफरचा प्राइज बँड प्रती समभाग ६९५ रूपये ते ७१२ दरम्यान ठरवण्यात आला आहे.

TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

कंपनी २७६८ कोटींचा निधी उभारणार

बिड लॉट २० समभाग आहे आणि त्यानंतर २० समभागांच्या प्रमाणात आहे. समभाग विक्रीतून कंपनी २७६८.२५ कोटींचा निधी उभारणार आहे. या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या प्रत्येकी ५ रूपये दर्शनी मूल्याच्या ३८,८८०,००० समभागांचा समावेश विक्रीच्या ऑफरद्वारे आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या २,८५०,८८० समभागांचा आणि सनलाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट आयएनसीच्या ३६,०२९,१२० समभागांचा समावेश आहे.

PMC सह ‘या’ २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई; पाहा, डिटेल्स

कंपनीकडे एकूण ११२ म्युच्युअल फंडांच्या योजना 

आदित्य बिर्ला सन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीकडे एकूण २९३६.४२ कोटींची मालमत्ता व्यवस्थापनाअंतर्गत आहे. कंपनी एकूण ११२ म्युच्युअल फंडांच्या योजना हाताळत आहे. कंपनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि इतर गुंतवणूक सेवा देते. ऑफरमध्ये एबीसीएल समभागधारकांकडून सबस्क्रिप्शनसाठी १,९४४,००० समभागांसाठी आरक्षणाचा समावेश आहे. ऑफर आणि निव्वळ ऑफरमध्ये कंपनीचे पोस्ट ऑफर पेड अप समभाग भांडवलाच्या १३.५० टक्के आणि १२.८३ टक्के समाविष्ट असतील. हे समभाग बीएसई आणि एनएसईवर नोंदणीकृत करणे प्रस्तावित आहे.
 

Web Title: aditya birla sun life amc eyes rs 20500 cr valuation in rs 2768 cr ipo to opens 29 september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app