शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 21:45 IST

आपल्या एअरफोर्सने पश्चिमेकडील, मध्य आणि पूर्वेकडील इराणमधील सहा विमानतळांवर हल्ला केला. यात रनवे, अंडरग्राउंड हँगर, ईंधन भरणारे विमानं, एफ-14, एफ-5 आणि एएच-1 विमाने नष्ट झाली, असा दावाही आयडीएफने केला आहे...

आपल्या 50 हून अधिक लढाऊ विमानांनी, गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे, तेहरानमधील इराणच्या अंतर्गत सुरक्षा दलांशी संबंधित आणि इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी (IRGC) संबंधित काही महत्वाच्या कमांड सेंटर्स तथा मालमत्तांवर हवाई हल्ले केले, असा दावा इस्रायली लष्कराने (IDF) सोमवारी केला. याशिवाय, हे हवाई हल्ले, इराणी शासनाच्या लष्करी क्षमतांना नुकसान पोहोचवण्यासाठी, तेहरान परिसरातील इराणच्या लष्करी मुख्यालयावर, क्षेपणास्त्र आणि रडार उत्पादन स्थळांवर तथा क्षेपणास्त्र साठवणुकीला लक्ष्य करून करण्यात आले, असेही आयडीएफने म्हटले आहे.

आयडीएफने म्हटले आहे की, "आपण इराणच्या अनेक सैन्य मुख्यालयांवर हल्ला केला, यात 'थरल्लाह' मुख्यालयाचाही समावेश आहे. जे रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे सामान्य मुख्यालय आहे. हे मुख्यालय तेहरानला अंतर्गत धोक्यांसह इतर संरक्षण धोक्यांपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आले होते. याशिवाय, इस्रायली लढाऊ विमानांनी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या अंतर्गत येणाऱ्या आणि इराणच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदार अलणाऱ्या 'सय्यद अल-शहादा' ब्रिगेडवरही बॉम्बहल्ला केला."

आयडीएफने म्हटले आहे की, "त्यांनी इराणच्या लष्करी क्षमतेवर हल्ले तीव्र केले आहेत आणि इस्रायलच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई सुरूच राहील. या हल्ल्यात आयआरजीसीच्या मध्यवर्ती सशस्त्र तळांपैकी एक असलेल्या बासीज मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. इतर कामांबरोबरच, हे मुख्यालय इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची माहिती अधिकाऱ्यांना कळवण्याचे काम करते. इस्रायली हवाई हल्ल्यामुळे अल्बोरज कोरचेही नुकसान झाले, जे तेहरानच्या आसपासच्या शहरांचे विविध धोक्यांपासून संरक्षण करते. तसेच शासनाच्या स्थिरतेसाठीही काम करते.

याशिवाय, इस्रायली लढाऊ विमानांनी इराण अंतर्गत सुरक्षा दलांच्या अखत्यारीत येणाऱ्या गुप्तचर आणि जनरल सिक्युरिटी पोलिसांनाही लक्ष्य केले. यामुळे, इराणची सैन्य क्षमता आणि नियंत्रण स्थापित करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे, असे आयडीएफने म्हटले आहे. तसेच, आपल्या एअरफोर्सने पश्चिमेकडील, मध्य आणि पूर्वेकडील इराणमधील सहा विमानतळांवर हल्ला केला. यात रनवे, अंडरग्राउंड हँगर, ईंधन भरणारे विमानं, एफ-14, एफ-5 आणि एएच-1 विमाने नष्ट झाली, असा दावाही आयडीएफने केला आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध