शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलने ऑस्कर विजेत्या पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचे अपहरण केले, जबर मारहाण; गाझावर बनविलेला सिनेमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:14 IST

हमदन बल्लाल यांना इस्रायलने ओलीस ठेवले आहे. बल्लाल यांचे सह दिग्दर्शक युवल अब्राहम यांनी एक्सवर याची माहिती दिली आहे.

इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांविरोधात पुन्हा हवाई तसेच जमीनीवरून कारवाया सुरु झाल्या आहेत. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच मोठेपणा मिरवत युद्ध थांबविल्याचे जाहीर केले होते. याला दोन, तीन आठवडे उलटत नाहीत तोच इस्रायलने गाझापट्टीत मोठे हल्ले सुरु केले आहेत. यापुढे जाऊन इस्रायल आता हमासच्या मार्गावर निघाला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेत्या पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचे अपहरण करण्यात आले आहे. 

हमदन बल्लाल यांना इस्रायलने ओलीस ठेवले आहे. बल्लाल यांचे सह दिग्दर्शक युवल अब्राहम यांनी एक्सवर याची माहिती दिली आहे. काही इस्रायली लोकांनी वेस्ट बँक भागातून हमदन यांना त्यांच्या घराजवळ पकडले. त्यांना जबर मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्याला आणि पोटावर दुखापत झाली आहे. हमदन यांनी जेव्हा अॅम्बुलन्स बोलावली तेव्हा इस्रायली सैनिकांनी ती रोखली आणि हमदन यांना पळवून नेले. या घटनेपासून हमदन यांची काहीच माहिती मिळत नाहीय, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

हमदानला इस्रायली वस्तीतील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याचा दावा युवल यांनी केला आहे. तसेच त्याला कोणालाही भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी नाही. वकीलही त्याच्याशी बोलू शकत नाहीत. या परिस्थितीत ते कसे आहेत हे माहिती नाही, असे युवल यांनी म्हटले आहे. सीएनएननेयाबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये बल्लाल यांच्या घराबाहेर काही इस्रायली जमले होते. घराबाहेर इस्रायली पोलिस आणि सैन्यही उपस्थित होते. बल्लालला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकावर इस्रायली सैनिक गोळीबार करत होते.

या दोघांनी मिळून ‘नो अदर लँड’ असा सिनेमा बनविला आहे. या सिनेमाला ऑस्करमध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री अवॉर्ड मिळाला होता. युद्धादरम्यान पॅलेस्टाईन कार्यकर्ता आणि युवल यांच्यातील मैत्री आणि संघर्ष या सिनेमात दाखविला आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायल