शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 08:51 IST

इराणवरील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले.

Iran Israel War: गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. इस्रायलने मदत मागितल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणमध्ये घुसून त्यांच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर जोरदार हवाई हल्ला केला. इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणु तळांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यानंतर  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकन सैन्याने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला असून सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे  कौतुक केले आहे.  अमेरिकेने ताकदीने काम केले आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हाच खरा मार्ग आहे, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

"अमेरिका खरोखरच अद्वितीय आहे. त्यांनी असं काही केलं आहे जे पृथ्वीवरील इतर कोणताही देश करू शकत नाही. इतिहासात नोंद आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवट, जगातील सर्वात धोकादायक शस्त्रे संपवण्याचे काम केले," असं नेतन्याहू यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो की,'शांतता शक्तीतून येते. आधी ताकद दाखवली जाते, नंतर शांतता येते,' आज रात्री, ट्रम्प आणि अमेरिकेने पूर्ण ताकदीने त्यांचे काम केले आहे," असं म्हणत नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लष्करी कारवाईबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले.

 दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी कारवाईबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आनंद व्यक्त करत सैनिकांचे अभिनंदन केले. "लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकन सैन्य सुरक्षितपणे अमेरिकेत परतत आहे. आपल्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असं ट्रम्प यांनी म्हटलं.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायल