शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

इराणने निश्चित केली ४ टार्गेट, अमेरिका-इस्राइलला दणका देण्यासाठी आखली खास योजना, होतील भयंकर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:41 IST

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आज एक महिना लोटत आला आहे. या महिनाभराच्या काळात हे युद्ध एका भयंकर वळणावर पोहोचलं आहे. तसेच मिळत असलेल्या माहितीनुसार इराण आता या संघर्षाला ऊर्जा युद्धामध्ये परिवर्तित करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे.

अमेरिका  इस्राइल यांनी इराणविरोधात सुरू केलेल्या संघर्षाला आज एक महिना लोटत आला आहे. या महिनाभराच्या काळात हे युद्ध एका भयंकर वळणावर पोहोचलं आहे. तसेच मिळत असलेल्या माहितीनुसार इराण आता या संघर्षाला ऊर्जा युद्धामध्ये परिवर्तित करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. त्यासाठी इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने चार मोठी लक्ष्यं निश्चित केली आहेत. या माध्यमातून अमेरिका आणि इस्राइला रणनीतिक हानी पोहोचवण्याची योजना इराणने आखली आहे.

या धोरणानुसार इराणने उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद करणे हे होय. या सागरी मार्गाने जगातील सुमारे २० टक्के तेलाची वाहतून होते. हा मार्ग पूर्णपणे बंद केला गेला तर याचा फटका केवळ अमेरिका आणि इस्राइललाच नाही तर जगातील अनेक देशांना बसणार आहे.

तर इराणचं दुसरं लक्ष्य आहे ते म्हणजे इस्राइलचा वीज व्यवस्था. इराणच्या योजनेनुसार इस्राइलच्या ओरोट रॉबिन, रुटेनबर्न, हागिट एश्कोल आणि दलिया या पाच प्रमुख वीज केंद्रांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. या पाच केंद्रांमधून इस्राइलच्या एकूण गरजेच्या ५० टक्क्यांहून अधिक विजेची गरज भागवली जाते. त्यामुळे या वीजकेंद्रांना लक्ष्य केलं गेलं तर त्याचा इस्राइलला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो.

इराणचं तिसरं लक्ष्य आहे ते म्हणजे अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध. येत्या काळात अमेरिकेची भागीदारी असलेल्या कंपन्या आणि योजनांना इराणकडून लक्ष्य केलं जाऊ शकतं. यामध्ये एडीएनओसी ड्रिलिंग, सौदी अरेबियाच्या अरामकोशी संबंधित प्रकल्प याबरोबरच ExxonMobil  आणि Baker Hughes सारख्या कंपन्यांची भागीदारी असलेल्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं जाऊ शकतं.

याबरोबरच इराणचं चौथं आणि सर्वात व्यापक टार्गेट असेल ते म्हणजे आखाती देशांची ऊर्जा संरचना. ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे सैनिकी तळ आहेत. अशा देशांमधील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात येऊ शकतं. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचा बरकाह अणू प्रकल्प, कतारचा उम्म अल हौल आणि रास लफ्पानसारखी ऊर्जा केंद्रं निशाण्यावर असतील. या केंद्रांवर हल्ला झाला तर पूर्ण आखातामधील वीज, पाणी आणि औद्योगिक औद्योगिक उलाढाल ठप्प होऊ शकते.

आता इराणने ही रणनीती अंमलात आणली तर त्याचे व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्यातरी इराणकडून ही योजना अमलात आणण्यात आलेली नाही. तसेच कूटनीतिक स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने दोन्ही बाजूंनी ऊर्जा संरचनांना लक्ष्य केलं जात आहे, त्यावरून परिस्थिती खूप बिघडू शकते, असे दिसत आहे.  

टॅग्स :IranइराणWarयुद्धUnited StatesअमेरिकाIsraelइस्रायलUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीsaudi arabiaसौदी अरेबिया