इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:56 IST2026-04-03T13:55:39+5:302026-04-03T13:56:22+5:30

अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत इराणचा एक बांधकामाधीन महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला. याचा बदला घेण्यासाठी आता ईराणनेही खाडी देशांतील आठ मोठ्या पुलांची 'हिट लिस्ट' जाहीर केली आहे...

Iran has drawn up a 'master plan' for revenge! 8 major bridges in Gulf countries on 'hit list'; see the list | इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट

इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात आता इराणने बदल्याचा खास मास्टर प्लॅन आखला आहे. खरेतर, अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत इराणचा एक बांधकामाधीन महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला. याचा बदला घेण्यासाठी आता ईराणनेही खाडी देशांतील आठ मोठ्या पुलांची 'हिट लिस्ट' जाहीर केली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

'B-1' ब्रिजवर अमेरिकेचे दोन मोठे हल्ले -
खरेतर, अमेरिकेने गुरुवारी (२ एप्रिल) इराणमधील सर्वात उंच अशा 'B-1' ब्रिजवर दोन वेळा हल्ला करून तो उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे हा पूल अद्याप पूर्णपणे तयारही झालेला नव्हता. हा पूल तेहरानला करज शहराशी जोडणारा होता. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आता इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) खाडी देशांतील पुलांना निशाणा बनवण्याचा इशारा दिला आहे. 

हे ८ महत्वाचे पूल इराणच्या 'हिट लिस्टवर' -
अनादोलूने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या या हिट लिस्टमध्ये कुवेतचा 'शेख जाबेर अल-अहमद अल-सबाह सी ब्रिज', यूएईमधील 'शेख झायेद', 'अल मक्ता' आणि 'शेख खलिफा' ब्रिज, तसेच सौदी अरब आणि बहरीनला जोडणारा 'किंग फहद कॉजवे' यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जॉर्डनमधील 'किंग हुसेन', 'दामिया' आणि 'अब्दौन' हे पूलही इराणच्या संभाव्य हिटलिस्टवर आहेत.

Web Title : ईरान का बदला लेने का प्लान: खाड़ी के पुल 'हिट लिस्ट' में

Web Summary : अपने पुल के विनाश के बाद, ईरान जवाबी कार्रवाई की योजना बना रहा है। खाड़ी के आठ प्रमुख पुल कथित तौर पर ईरान की 'हिट लिस्ट' में हैं, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ रहा है। कुवैत, यूएई, सऊदी अरब, बहरीन और जॉर्डन के पुल लक्षित हैं।

Web Title : Iran Plans Retaliation: Gulf Bridges on 'Hit List'

Web Summary : Following the destruction of its bridge, Iran is planning retaliation. Eight key Gulf bridges are reportedly on Iran's 'hit list', escalating Middle East tensions. Bridges in Kuwait, UAE, Saudi Arabia, Bahrain and Jordan are targeted.