शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढ रोखणारा पॅरिस मसुदा सादर

By admin | Updated: December 13, 2015 01:50 IST

तापमानवाढ रोखून वसुंधरेला वाचविण्यासाठी व जगातील जीवाश्म इंधन वापरणाऱ्या देशांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने येत्या दशकात करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव

पॅरिस : तापमानवाढ रोखून वसुंधरेला वाचविण्यासाठी व जगातील जीवाश्म इंधन वापरणाऱ्या देशांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने येत्या दशकात करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव असलेला अंतिम करार फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबियस यांनी सदस्य राष्ट्रांसमोर शनिवारी सादर केला. त्यामुळे गेले बारा दिवस येथे चालू असलेली हवामान बदल परिषद यशस्वी व ऐतिहासिक झाल्याचे मानले जात आहे. सर्वाधिक तापमानाचे वर्ष असलेले २०१५ अंतिम टप्प्यात असताना गेली चार वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने चाललेले प्रयत्न आज मसुद्यावर सहमती झाल्याने सफल झाले. फॅबियस यांनी सर्व सदस्य राष्ट्रांना या करारास पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी केले. ते म्हणाले की, इतिहासाप्रती आपली बांधिलकी महत्त्वाची असून आपण ती जपली पाहिजे. परिषदेच्या मुख्य दालनात यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोईस होलांद, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी उपस्थित होते. पृथ्वीच्या तापमानवाढीने भविष्यात होणारे गंभीर परिणाम थांबविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची रूपरेषा या परिषदेत ठरविण्यात आली. भारताने उपस्थित केलेल्या बहुतेक मुद्यांचे समाधान अंतिम मसुद्यात करण्यात आल्याबद्दल केंद्रिय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी समाधान व्यक्त केले. (वृत्तसंस्था)