भूकंपग्रस्त नेपाळला भारत करणार १० हजार कोटींची मदत

By Admin | Updated: June 25, 2015 12:16 IST2015-06-25T12:12:38+5:302015-06-25T12:16:56+5:30

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या विनाशकारी भूकंपात उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्निर्माणासाठी भारतातर्फे १० हजार कोटींची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली.

India's assistance to 10,000-crore earthquake-affected Nepal | भूकंपग्रस्त नेपाळला भारत करणार १० हजार कोटींची मदत

भूकंपग्रस्त नेपाळला भारत करणार १० हजार कोटींची मदत

>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २५ - दोन महिन्यांपूर्वी आलेल्या विनाशकारी भूकंपात उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्निर्माणासाठी भारतातर्फे १० हजार कोटींची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. दोन दिवसांच्या नेपाळ दौ-यावर असलेल्या स्वराज काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. नेपाळमधील नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी भारत नेपाळ सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 
२५ एप्रिल रोजी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात ९ हजाराहूंन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर अनेक नागरिक जखमी झाले. या भूकंपामुळे नेपाळचे अपरिमित नुकसान झाले असून अनेक नागरिक बेघर झाले आहेत. 

Web Title: India's assistance to 10,000-crore earthquake-affected Nepal