शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला डिस्नेलँडमध्ये फिरायला नेलं आणि केली हत्या; हॉटेलमध्ये सापडला ११ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:51 IST

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेने मुलाची गळा चिरुन हत्या केली.

Crime News: अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या महिलेला तिच्या ११ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला कॅलिफोर्निया येथील डिस्नेलँडमध्ये आपल्या मुलासोबत फिरण्यासाठी गेली होती. डिस्नेलँडमध्ये  तीन दिवस घालवल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये चाकूने मुलाचा गळा चिरला. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे गेल्याने महिला नाराज होती आणि त्यातूनच तिने हे धक्कादायक कृत्य केलं.

४८ वर्षीय सरिता रामराजूवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. सरिता रामराजू आपल्या मुलासोबत डिस्नेलँडमध्ये तीन दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्याचवेळी हॉटेलमध्ये सरिता ११ वर्षीय मुलाचा गळा चिरला. हत्येनंतर सरिताने स्वतः पोलिसांना फोन केला.  मुलाची हत्या करुन आपण विष पिऊन आत्महत्या करत असल्याचे सरिताने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठलं. जिथे त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. काही तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विष प्यायल्याने सरिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

घटस्फोट घेतल्यानंतर २०१८ मध्ये सरिता रामराजू कॅलिफोर्नियातून निघून गेली होती. ती पती आणि मुलापासून वेगळी राहत होती. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात आला होता. तर सरिताला तिच्या मुलाला भेटण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे सरिता तिच्या मुलाला भेटण्यासाठी कॅलिफोर्नियात आली होती. गेल्या वर्षभरापासून मुलाच्या ताब्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. सरिताला  मुलाने व्हर्जिनियामध्ये राहायला हवं असं वाटत होते. पती माझ्या संमतीशिवाय मुलाचे वैद्यकीय आणि शाळेशी संबंधित निर्णय घेत होता आणि माझ्यावर अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप सरिताने केला होता.

दरम्यान, सरिताने स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चाकूने आपल्या मुलाची हत्या केली. तो हॉटेलच्या खोलीत सापडला. खुनाच्या काही दिवसांपूर्वी सरिताने चाकू खरेदी केला होता. मुलाची हत्या करून सरिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता सरिता सर्व आरोपांमध्ये दोषी आढळल्यास, तिला २६ वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल, असं वकिलांनी सांगितले.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस