भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द

By Admin | Updated: May 25, 2014 04:12 IST2014-05-25T04:12:40+5:302014-05-25T04:12:40+5:30

अमेरिकेतील भारतीय दंतवैद्यकाने ६४ वर्षाच्या महिला रुग्णाचे २० दात एकदम काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून, डॉक्टरचा परवाना रद्द झाला आहे

Indian dentistry cancellation license | भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द

भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द

न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय दंतवैद्यकाने ६४ वर्षाच्या महिला रुग्णाचे २० दात एकदम काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून, डॉक्टरचा परवाना रद्द झाला आहे. डॉक्टर रश्मी पटेल असे दंतवैद्यकाचे नाव आहे. त्याने ज्युडीथ गान (६४) या महिलेवर १७ फेब्रुवारी रोजी हे उपचार केले. या उपचारात दात काढणे व इम्प्लांट करणे असा समावेश होता. रुग्ण तिथेच बेशुद्ध पडली. डॉक्टरच्या सहायकाने त्याला उपचार थांबविण्याची विनंती केली; पण डॉक्टरला इम्प्लांट उपचार पूर्ण करायाचे होते. अखेर सहायक तेथून निघून गेला व त्याने ९११ ला फोन केला. तोपर्यंत रुग्ण बेशुद्ध पडली होती. या संदर्भात डॉ. पटेलवर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डॉक्टरने रुग्णाची योग्य ती काळजी घेतली नाही. रुग्णाचा आॅक्सिजन कमी होऊन, श्वास घेण्यास त्रास होत असताना गरज असणारी मदत दिली नाही. दातावरील उपचारामुळे गानचे निधन झाले नसून पटेल यांच्या निष्काळजीपणामुळे तिचे निधन झाले असे दुसर्‍या डॉक्टरने म्हटले आहे. (वृत्तसंस्था) पटेल यांचा परवाना २१ एप्रिल रोजी निलंबित करण्यात आला असून, राज्याच्या दात आयोगासमोर १८ जून रोजी पुढील सुनावणी आहे. पटेल यांचे दोन दवाखाने आहेत. त्यात एक रुग्ण दगावला असून, दुसर्‍या रुग्णाला सहा दिवस रुग्णालयात काढावे लागले आहेत. त्यामुळे डॉ. पटेल यांनी रुग्णांवर उपचार करूनयेत असे सांगण्यात आल्याचे राज्य आरोग्य अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Web Title: Indian dentistry cancellation license