शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:08 IST

India Vs Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन परदेशी आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचे पाणी बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानने ही युद्धाचीच घोषणा असल्याचा दावा करत अधिकारासाठी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच एलओसी मानणारा शिमला करारही निलंबित केला आहे. या हल्ल्याचा भारत बदला घेणार अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळे पाकिस्तानने रणगाडे, मिसाईल आदी शस्त्रास्त्रे सीमेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे पाकिस्तान युद्धाची तयारी करू लागला आहे. 

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन पाकिस्तानी आहेत. या सर्वांचा शोध घेतला जात आहे. २२ मार्चला हल्ला झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाकिस्तानी लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली होती. ही त्यांची कृती नेहमीची नव्हती. तसेच भारतीय सीमेजवळून टेहळणी विमानही गेले होते. आता पाकिस्तान भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणत असल्याचे समोर येत आहे. 

सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये पाकिस्तानी सैन्य सीमेवर मोठ्या प्रमाणावर हालचाली करत आहे. दोन अतिरिक्त रेजिमेंट तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच टँक, चिलखती वाहने देखील मोठ्या संख्येने सीमेकडे नेली जात आहेत. लढाऊ विमाने कमी उंचीवरून उडण्याचा सराव करत आहेत. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

भारत काय करतोय...पाकिस्तानने तिकडे तयारी सुरु केलेली असताना भारतानेही तयारी सुरु केलेली आहे. हवाई दलाने राजस्थानमध्ये युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामध्ये राफेल लढाऊ विमाने देखील सहभागी झाली आहेत. हवेतून सपाट जमिनीवर तसेच डोंगररागांमध्ये हल्ला करण्याचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. याचे नाव आक्रमण असे ठेवण्यात आले आहे. तसेच भारतीय सैन्याला सीमेवर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत