शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शांततेसाठी झटूनही भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थान नाहीच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: June 8, 2015 10:37 IST

पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकले नाही असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ७ - पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांतता व सुरक्षेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकलेले नाही, ही खेदाची बाब असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढाका येथे व्यक्त केले. मोदींच्या दोन दिवसीय बांगलादेश दौ-याची आज समाप्ती झाली, त्यापूर्वी ढाका येथे पाच हजार नागरिकांना संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ' ज्या देशाने बांगलादेशवर जुलूम केले त्यांच्याच ९० हजार सैनिकांचे भारताने आत्मसमर्पण केले. भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्यासाठी ही एकच बाब पुरेशी आहे.' असेही ते म्हणाले. गरीब देशांना एकत्र घेऊन आम्ही जगाच्या मंचावर पुढे जाऊ इच्छितो, असे त्यांनी सांगितले. 'दहशतवादाला कोणीतीही सीमा नसते, दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे. त्याला हरवण्यासाठी मानवतावादी देशांनी एकत्र येणे अनिवार्य आहे. आपल्याला मानवतेच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे. बांगलादेश हा एकमेव देश आहे, ज्याने दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरेंस'ची नीती अवलंबली आहे, त्याचे मी स्वागत करतो' असेही मोदींनी यावेळी सांगितले. 
 पक्षी, वारा आणि पाणी यांना व्हिसा लागत नाही. गंगा- व ब्रह्मपुत्रा नदीवर आपण एकत्र चाललो आहोत. पाणी हा राजकीय मुदा नसून मानवी मूल्यांच्या आधारे या मुद्याचे निरसन व्हायला हवे, असे ते म्हणाले.  
महिला सबलीकरणासाठी बांगलादेशमध्ये करण्यात आलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच भारत -बांगलादेशदरम्यान झालेला लँड बाऊंड्री करार हा हृदयांना जोडणारा करार असल्याचेही ते म्हणाले.