शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या हल्ल्यांत वाढ

By admin | Updated: October 23, 2015 03:48 IST

इस्लामिक स्टेटच्या (इसिस) जगभरातील हिंसाचारात अलीकडे प्रचंड वाढ झाली आहे. या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने गेल्या तीन महिन्यांमध्ये एक हजार हल्ले

लंडन : इस्लामिक स्टेटच्या (इसिस) जगभरातील हिंसाचारात अलीकडे प्रचंड वाढ झाली आहे. या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने गेल्या तीन महिन्यांमध्ये एक हजार हल्ले केले असून त्यात तीन हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. आयएचएस जेनस् या विश्लेषण प्रतिष्ठानाने गुरुवारी ही माहिती दिली.या जिहादी संघटनेच्या दररोजच्या हल्ल्यात ४२ टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. इसिसचे जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान दररोजच्या हल्ल्यांचे प्रमाण ११.८ होते, तर तत्पूर्वी एप्रिल ते जूनदरम्यान हेच प्रमाण ८.३ होते. आकडेवारीवरून अमेरिकाप्रणीत हवाई हल्ल्यांचा इसिसवर फार थोडा परिणाम झाल्याचे दिसते. लंडन येथील या विश्लेषण प्रतिष्ठानाच्या नोंदीनुसार इसिसने या काळात १०८६ हल्ले केले व त्यात २,९७८ लोक मृत्युमुखी पडले. मृतांत सामान्य नागरिक व सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इसिसच्या हल्ल्यांमुळे दररोज होणाऱ्या जीवितहानीच्या प्रमाणात आधीच्या तिमाहीच्या तुलनेत या तीन महिन्यांत ६५.३ टक्के एवढी प्रचंड वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ८१ टक्के आहे. आयएचएस जेनस्ने खुल्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी तयार करण्यात आली आहे. इसिसने याहून कितीतरी अधिक हल्ले केले असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची खातरजमा होऊ शकली नाही. या आकडेवारीत नायजेरियाच्या बोको हराम संघटनेचे हल्ले आणि त्यातील जीवितहानीचा समावेश आहे. बोको हरामने मार्चमध्ये आपण इसिसशी संलग्नित असल्याचे घोषित केले होते. (वृत्तसंस्था)