इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 04:10 PM2019-02-28T16:10:10+5:302019-02-28T16:10:55+5:30

भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Imran Khan to call Narendra Modi, to avoid stress? | इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार? 

इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार? 

इस्लामाबाद - भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारताकडून रणनीतिक आणि कुटनीतिक स्तरावर वाढवण्यात येणाऱ्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. 

यासंदर्भातील वृत्त सीएनएन न्यूज 18 ने दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करण्याच्या तयारीत असून, दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चा करणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

 पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे  भारतआणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राज आळवला आहे होता. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खान यांनी काल केला होता.  ''भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही.'' असा दावा त्यांनी केला होता. 

Web Title: Imran Khan to call Narendra Modi, to avoid stress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.