पश्चिम आशियातील युद्धाचा भडका उडालेला असतानाच, अमेरिकेचे प्रख्यात अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी संयुक्त अरब अमिरातीला अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. "जर युएई या युद्धात सामील झाला, तर दुबई आणि अबू धाबी यांसारखी शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात," असे विधान सॅक्स यांनी केले आहे. यामुळे जागतिक पर्यटनाचे आणि व्यापाराचे केंद्र असलेल्या दुबईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एएनआयशी बोलताना जेफ्री सॅक्स म्हणाले की, दुबई आणि अबू धाबी ही शहरे लष्करी कारवायांसाठी किंवा क्षेपणास्त्र बचावासाठी तयार केलेली नाहीत. "हे रिसॉर्ट्स आणि पर्यटनाचे क्षेत्र आहेत. जिथे श्रीमंत लोक पार्ट्या करतात आणि पैसा खर्च करतात, अशा ठिकाणी युद्धात प्रवेश करणे म्हणजे त्या शहरांच्या निर्मितीचा मूळ उद्देशच संपवणे आहे," असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेशी युती करणे ही मोठी चूक?सॅक्स यांनी असा दावा केला की, युएईने अमेरिका आणि इस्रायलशी युती करून स्वतःला एका विचित्र पेचात अडकवून घेतले आहे. अमिराती वारंवार आपल्या जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत असून, या युद्धातील सहभाग त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
इराणचा प्रत्याघात आणि वाढता तणावअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लवकरच शांतता करार होईल असे आश्वासन दिले असतानाच, तेहरानवर हल्ला करण्यात आला. याला चोख प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल, कुवैत आणि सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, युएईने तटस्थ राहावे, असा सल्ला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
इशारा दिला आणि मगच केला हल्लाइस्रायली लष्कराने लेबनॉनची राजधानी बैरुतच्या दक्षिण उपनगरांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. 'अल जजीरा'च्या वृत्तानुसार, हे हल्ले इतके तीव्र होते की संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हल्ला करण्यापूर्वी इस्रायली लष्कराने बैरुतमधील सात प्रमुख भागांना लक्ष्य करण्याची ताकीद दिली होती. तिथल्या स्थानिक रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. लष्करी प्रवक्त्यांच्या मते, हे भाग 'हिजबुल्लाह'च्या तळांशी संबंधित असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
Web Summary : Economist Jeffrey Sachs warns UAE's involvement in war could devastate Dubai and Abu Dhabi. Alliances with the US and Israel are risky, potentially destroying tourism and trade hubs. Iran's retaliation and rising tensions demand UAE remain neutral, avoiding self-destruction.
Web Summary : अर्थशास्त्री जेफ्री सैक्स ने यूएई को युद्ध में शामिल होने पर दुबई और अबू धाबी के विनाश की चेतावनी दी है। अमेरिका और इजरायल के साथ गठबंधन जोखिम भरा है, जिससे पर्यटन और व्यापार केंद्र नष्ट हो सकते हैं। ईरान का बदला और बढ़ता तनाव यूएई को तटस्थ रहने की मांग करता है, आत्म-विनाश से बचें।