शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील हिंदूंवर अजून किती काळ अत्याचार चालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:14 IST

पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले जात आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले जात आहे. त्यांच्यावर बलात्कारही होतात. हे अत्याचार थांबणार तरी कधी असा परखड सवाल पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट)चे नेते खेलदास कोहिस्तानी यांनी नॅशनल असेम्ब्लीत मंगळवारी विचारला.गेल्या चार महिन्यांत पाकिस्तानातील २५ ते ३० हिंदू मुलींचे अपहरण झाले आहे. त्या पुन्हा कधीच घरी परत आल्या नाहीत. पाकिस्तानातील हिंदूंची मंदिरे यापुढेही उद््ध्वस्त होत राहतील का? अजून किती काळ हिंदूंच्या हत्या होणार आहेत? असे सवाल करून कोहिस्तानी म्हणाले की, हिंदूंवर अत्याचार करण्याचे प्रकार सिंध प्रांतातील उमरकोट, घोटकी येथेच का घडत आहेत? हा वणवा साऱ्या सिंध प्रांतात पसरण्याची शक्यता असल्याने वेळीच त्याला रोखले पाहिजे. सिंध प्रांतातील काही लोकांना पाकिस्तान सरकारने अटक झाली पाहिजे.पाकिस्तानमधील अल्पसंख्याक सुरक्षित असल्याची ग्वाही तेथील सरकारने अनेकदा दिली. मात्र, वस्तुस्थिती निराळीच आहे. घोटकी शहरातील रहिवासी असलेली व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी नम्रिता चंदानी हिचा मृतदेह वसतिगृहातील तिच्या खोलीत नुकताच आढळून आला.काश्मीरमध्ये भारत मानवी हक्कांची गळचेपी करीत आहे असा कांगावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जिनिव्हा येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीच्या ४२ व्या परिषदेत केला होता. त्यानंतर काही दिवसांनीच नम्रता चंदानी हत्या प्रकरणघडले. (वृत्तसंस्था)>अहमदिया, शियांचाही छळपाकिस्तान अल्पसंख्याकांवर होणाºया अत्याचाराचा भारतातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून नेहमीच निषेध केला आहे, तसेच आंतरराष्ट्रीय समुदायानेही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन, शीख यांचे जबरदस्तीने धर्मांतर करणे, अहमदिया, शियांचा छळ करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची वेळप्रसंगी हत्या केली जाते. त्यांच्या मुलींवर बलात्कारही केला जातो, असे आरोप होत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान