शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:54 IST

भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी 'ड्रॅगन' अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले आहे.

आज भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण असून, भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी 'ड्रॅगन' अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून, शुभांशू शुक्ला आता १४ दिवस अवकाशात संशोधन करणार आहेत.

शुभांशू शुक्ला अंतराळातून पाठवलेला त्यांचा पहिला व्हिडिओ मेसेजही समोर आला आहे. त्यात ते हसून म्हणाले की, "अंतरिक्षातून नमस्कार! एका लहान मुलाप्रमाणे मी अंतराळात चालणे-फिरणे आणि खाणे-पिणे शिकत आहे. मी खूप झोपत आहे." त्यांचे हे शब्द भारताच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाची साधेपणाने पण दृढपणे ग्वाही देत आहेत.

राकेश शर्मा यांच्यानंतर 'भारताचा दुसरा सुपुत्र' अवकाशात!
भारतीय हवाई दलाने या क्षणाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला एका ऐतिहासिक प्रवासावर निघाले आहेत. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी ४१ वर्षांपूर्वी (१९८४ मध्ये) अवकाशात तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आता ४१ वर्षांनी पुन्हा एकदा भारताचा सुपुत्र अंतराळात पोहोचला आहे. हे केवळ एक मिशन नसून, भारताच्या वाढत्या अंतराळ सामर्थ्याचे प्रतीक आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, "भारतसह ४ देशांच्या अंतराळवीरांना घेऊन जाणारे हे अंतराळ मिशन एक मैलाचा दगड ठरेल. देशाला त्यांच्यावर गर्व आहे. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा."

ISS वर 'उत्स्फूर्त' स्वागत आणि Axiom-4 मिशन!
२८ तासांच्या रोमांचक प्रवासानंतर, शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीमचे ISS वर सध्या वास्तव्यास असलेल्या सात अंतराळवीरांनी (ज्यामध्ये तीन नासाचे, एक जपानचा आणि तीन रशियन अंतराळवीर आहेत) उत्साहात आणि आपुलकीने स्वागत केले.

हे मिशन Axiom-4 चा भाग आहे, जे ह्यूस्टन (अमेरिका) येथील Axiom Space द्वारे आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत, शुभांशु शुक्ला आणि त्यांची टीम पुढील १४ दिवस ISSवर विविध वैज्ञानिक प्रयोग करतील.

इतिहास घडवणारी आंतरराष्ट्रीय टीम
या Axiom-4 मिशनची कमान पेगी व्हिटसन यांच्या हातात आहे. त्या नासाच्या माजी अंतराळवीर असून, आता Axiom Space मध्ये मानव अंतराळ उड्डाण विभागाच्या संचालक आहेत. त्यांच्यासोबत टीममध्ये शुभांशु शुक्ला (भारत), स्लावोश उझनांस्की-विशनेव्स्की (पोलंड) आणि तिबोर कापू (हंगेरी) यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, भारत, पोलंड आणि हंगेरी या तिन्ही देशांसाठी गेल्या चार दशकांनंतरची ही पहिलीच मानवी अंतराळ मोहीम आहे आणि ISS पर्यंत पोहोचण्याचे त्यांचे हे पहिलेच मिशन आहे. शुभांशु शुक्ला यांच्या या ऐतिहासिक प्रवासाने भारताच्या अंतराळ इतिहासात नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या पुढील १४ दिवसांच्या संशोधनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Spaceअंतरिक्षisroइस्रो