शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अमेरिकेने घातलेल्या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनला काश्मीरमध्ये नुकसान होण्याऐवजी फायदा होण्याचीच शक्यता?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 6:11 PM

जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत तिच्यावर नुकतीच बंदी घातली होती. मात्र या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना पायबंद बसण्याऐवजी त्यांना फायदाच होण्याची शक्यता आहे.

श्रीनगर, दि. 21 -  जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत तिच्यावर नुकतीच बंदी घातली होती. मात्र या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना पायबंद बसण्याऐवजी त्यांना फायदाच होण्याची शक्यता आहे. मुस्लिमबहूत काश्मीर खोऱ्यात अमेरिकाविरोधी वातावरण असल्याने या बंदीचे विपरित परिणामही दिसू शकतात, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   गेल्या काहीवर्षांत अर्थपुरवठा आणि विचारसरणीमधून झालेल्या अंतर्गत संघर्षाचा फटका हिज्बुल मुजाहिद्दीनला बसला आहे. त्याबरोबरच जेकेएलएफसारख्या दहशतवादी संघटनांनी 1994 साली सशस्त्र संघर्षाचा मार्ग सोडल्याने त्याचाही हिज्बुल मुजाहिद्दीनवर परिणाम झाला. मात्र असे असले तरी ही दहशतवादी संघटना काश्मीर खोऱ्यात सक्रीय राहिली. एवढेच नाही तर तिला स्थानिक नागरिकांकडून पाठिंबाही मिळत राहिला. दरम्यान, हुर्रियतच्या एका वरिष्ठ नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, सय्यद सलाउद्दीन आता पाकव्याप्त काश्मीर आणि दक्षिण काश्मीरमधून हिज्बुल मुजाहिद्दीनचा कारभार चालवत आहे.  त्याबरोबरच काश्मीरमधील मुख्य राजकीय पक्ष असलेले पीडीपी, नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस या पक्षांनासुद्धा हिज्बुल मुजाहिद्दीनवर करण्यात आलेल्या कारवाईचा फारसा फायदा होईल असे वाटत नाही. हे राजकीय पक्ष हिज्बुलवर झालेल्या या कारवाईकडे सांकेतिक कुटनीतिक कारवाई म्हणून पाहत आहेत. ज्याचा वास्तवात या दहशतवादी संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही.   काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीनला दणका देताना अमेरिकेने या दहशतवादी संघटनेचा आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला होता. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली होती. अमेरिकेने केलेली ही करवाई म्हणजे दहशतवादाच्या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडण्याच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश म्हणून पाहिले जात होते. अधिक वाचा हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेचा दणका, दहशतवादी संघटना घोषित करत घातली बंदी काश्मीरमध्ये लष्कराचा टॉप कमांडर आयुब ललहारीला कंठस्नानभारत-पाक युद्ध असंभव!अमेरिकेने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना असलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनला परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिकेमधीला या दहशतवादी संघटनेची कुठलीही संपत्ती अमेरिका जप्त करेल. तसेच या दहशतवादी संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येऊ नयेत, असे निर्देश अमेरिकी नागरिकांना देण्यात येतील, असे या कारवाईबाबत अमेरिकेचा राजकोषीय विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले होते.याआधी जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्यापूर्वी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याचे त्याने म्हटले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू काश्मिर