काश्मीरमध्ये लष्कराचा टॉप कमांडर आयुब ललहारीला कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 07:59 PM2017-08-16T19:59:40+5:302017-08-16T20:09:37+5:30

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक  मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठस्नान घातले आहे.

Army top commander in Kashmir, Ioob Lahli |  काश्मीरमध्ये लष्कराचा टॉप कमांडर आयुब ललहारीला कंठस्नान

 काश्मीरमध्ये लष्कराचा टॉप कमांडर आयुब ललहारीला कंठस्नान

श्रीनगर, दि. 16 -  काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक  मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठस्नान घातले आहे. याआधी रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा केला होता.  
या चकमकीबाबत माहिती देताना जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य म्हणाले की, आयूब ललहारीचा खात्मा हे भारतीय लष्कराच्या मोहिमेला मिळालेले मोठे यश आहे. ललहारी हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. आज बांदेरपोरा भागात एका घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर   लष्कराकडून शोधमोहीम सुरू  करण्यात आली. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत ललहारी याला ठार करण्यात आले."  
  या ठिकाणी अद्याप चकमक सुरू आहे. तसेच सुरक्षा दलांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेरले आहे. तसेच दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर 47 राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने शोध मोहिम सुरू केली होती.  




 याआधी, दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या जवानात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचा जवान सुमेध वामन गवई, तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांचा समावेश होता.
शोपिया जिल्ह्यात अवनीरा गावात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जम्मू - काश्मीर पोलीस, सैन्यदल आणि सीआपीएफने विशेष मोहीम हाती घेऊन तपास सुरू केला. याच वेळी चकमक उडाली. यात सैन्याचे पाच जवान जखमी झाले. जखमी झालेल्या पाच जवानांना सैन्याच्या ९२ बेस येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा नंतर मृत्यू झाला. रात्रभर चकमक सुरू होती. त्यादरम्यान लष्कराने सकाळी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते. 

Web Title: Army top commander in Kashmir, Ioob Lahli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.