"ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:05 IST2026-01-21T11:05:02+5:302026-01-21T11:05:52+5:30

"जगात शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच प्रस्थापित केली जाऊ शकते आणि अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे...!"

Greenland is a must, peace is only possible through strength Now denmark is the next target of the US Trump's statement creates a stir | "ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ

"ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ

ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापीटा जगजाहीर आहे. या भूमीसंदर्भातील त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अगदी जागतिक राजकारणातच मोठी खळबळ उडाली आहे. ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पडेन्मार्कला थेट धमकावतानाही दिसत आहेत. यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी ग्रीनलँडवर ताबा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रम्प म्हणत आहेत.

शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच प्रस्थापित होऊ शकते - 
या भागातील रशियन आणि चिनी नोदलाच्या वाढत्या हालचाली अमेरिकेच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरू शकतात. यामुळे, अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी ग्रीनलँडवर नियंत्रण आवश्यक आहे, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे. एवढेच नाही तर, "जगात शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच प्रस्थापित केली जाऊ शकते आणि अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे," असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिका आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी ग्रीनलँड ताब्यात असणे आवश्यक -
ग्रीनलँडच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी सोमवारी (१९ जानेवारी) नाटो प्रमुख मार्क रूट यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील दावोस येथे एका विशेष बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. महत्वाचे म्हणजे, अमेरिका आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. नाटोच्या हितासाठी आपण अनेक पावले उचलली असून, यावरही सर्वांना मान्य होईल असाच मार्ग काढू, असेह ट्रम्प यांनी म्हटेल आहे.

सोशल मीडियावरील नकाशाने वाढवला वाद -
ग्रीनलँड वादात अधिक भर टाकणारी गोष्ट म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर एक नकाशा शेअर करत, थेट ग्रीनलँड, व्हेनेझुएला आणि कॅनडाही अमेरिकेचा भाग म्हणून दाखवले आहेत. ट्रम्प यांच्या या कृतीने आंतरराष्ट्रीय पातळीवच खळबळ उडाली असून तर्कांनाही उधान आले आहे.

Web Title : ग्रीनलैंड पर ट्रम्प का जोर: शक्ति, शांति, और क्या अमेरिका का अगला निशाना?

Web Summary : ट्रम्प द्वारा ग्रीनलैंड की आक्रामक खोज, डेनमार्क को धमकी तक, विवाद पैदा करती है। उनका दावा है कि रूसी और चीनी नौसेना गतिविधि के खिलाफ अमेरिकी सुरक्षा के लिए नियंत्रण महत्वपूर्ण है। ट्रम्प का दावा है कि शक्ति शांति सुनिश्चित करती है, अमेरिका की ताकत और ग्रीनलैंड के सामरिक महत्व की आवश्यकता पर प्रकाश डालता है। उनके सोशल मीडिया मानचित्र ने विवाद को और बढ़ा दिया।

Web Title : Trump's Greenland pursuit: Power, peace, and a potential US target?

Web Summary : Trump's aggressive pursuit of Greenland, even threatening Denmark, sparks controversy. He claims control is vital for US security against Russian and Chinese naval activity. Trump asserts power ensures peace, highlighting America's strength and the need for Greenland's strategic importance. His social media map further fueled the dispute.