Shubhanshu Shukla : इस्रो आणि नासाच्या मिशन अॅक्सिओम-04 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले शुभांशू शुक्ला आज त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह परतणार आहेत. ते १४ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते, ते आज १४ जुलै रोजी पृथ्वीवर परत येण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरवापसीपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळात पार्टी केल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्थानकाचा निरोप घेण्यापूर्वी शुभांशू यांनी सर्व क्रू सदस्यांसह फोटो सत्रात भाग घेतला.
ISS मधील या फोटोंमध्ये अॅक्सिओम-04 मिशन आणि एक्सपिडीशन 73 चे क्रू सदस्य हसत आणि एकत्र पोज देताना दिसत आहेत.
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
8 अंतराळवीरांचे फोटो
या फोटोंमध्ये एकूण ८ अंतराळवीर दिसत आहेत. ते सर्व अमेरिका, भारत, जपान, हंगेरी आणि पोलंडचे आहेत. सर्व अंतराळवीर खांद्याला खांदा लावून उभे आहेत आणि कॅमेऱ्यासमोर त्यांचे फोटो काढत आहेत.
जॉनी किमने फोटो शेअर केले
नासा अंतराळवीर जॉनी किमने हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये एक व्हिडीओ देखील आहे. पोस्ट शेअर करताना जॉनीने लिहिले की, टीमने भिंतीवर बसवलेल्या ट्रायपॉड आणि टाइम-लॅप्स कॅमेऱ्याच्या मदतीने हे फोटो क्लिक केले आहेत.
शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर पोहोचणार
अॅक्सिओम-04 मोहिमेअंतर्गत आयएसएसमध्ये गेलेले चार अंतराळवीर, शुभांशू शुक्ला (भारत), पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोज उजनांस्की-विस्निव्हस्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) आज पृथ्वीवर रवाना होतील. स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान आयएसएसवरून पृथ्वीवर दुपारी ४.३० वाजता उड्डाण करेल. हे अंतराळयान उद्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळ उतरेल.