शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 20:02 IST

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.वाढत्या तापमानामुळे आपलं स्वच्छ पिण्याचं पाणी जवळपास संपुष्टात यायला लागलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्वच्छ पाण्याची वाफ होण्याचा वेग इतका भयानक आहे, की त्यामुळे काही वर्षांत पाण्याचे साठे कोरडेठाक होऊ शकतात.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे दोन लाख लोकांना पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतक्या पाण्याची केवळ वर्षभरातच वाफ होतेय!भारतात पावसामुळे वर्षभरात सुमारे चार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं. त्यातल्या जवळपास अर्ध्या पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते.

‘नॅशनल कमिशन ऑन इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट’च्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी खुद्द सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार दरवर्षी पावसामुळे जे चार हजार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी उपलब्ध होतं, त्यातील २१३१ अब्ज घनमीटर पाणी उष्णतेमुळेच उडून जातं. जे १८६९ अब्ज घनमीटर पाणी उरतं, त्यातील केवळ ११२३ अब्ज घनमीटर पाणी वापरण्यायोग्य असतं. त्यातीलही फक्त ६९९ अब्ज घनमीटर पाणी भूपृष्ठावर राहातं, तर ४३३ अब्ज घनमीटर पाणी जमिनीखाली जातं.

केवळ वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याचं संकट इतकं गंभीर होत चाललंय, पण या गोष्टींकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही.ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे निसर्गाचं सगळं चक्रच उलटंपालटं होत असताना माणसाच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतं आहे. भुपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचे साठे वेगाने खालावत चालले आहेत. आपल्या भावी पिढ्यांसमोर तर जलसंकटाचा धोका खूपच मोठा आहे.

सरकारच्याच अनुमानानुसार आणखी सहा वर्षांनी म्हणजे २०२५मध्ये भारताच्या जवळपास १३९.४ कोटी लोकसंख्येसाठी वर्षाला प्रतिव्यक्ति केवळ १३४१ घनमीटर पाण्याची उपलब्धता असू शकेल. भारतात २०११मध्ये प्रतिव्यक्ति पाण्याची हीच उपलब्धता १५४५ घनमीटर होती. त्याचवेळी एशियन रिसर्च डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटनं आंतरराष्ट्रीय मानकांचा हवाला देऊन इशारा दिला आहे की, ज्या देशांत प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ति पाण्याची उपलब्धता १७०० घनमीटरपेक्षा कमी आहे, ते देश जलसंकटग्रस्त देश आहेत. 

टॅग्स :WaterपाणीResearchसंशोधन