शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीचा जागतिक भडका! अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले; 'या' देशांना बसला सर्वात मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:31 IST

Diesel Price Hike 81 Percent : अमेरिका-इराण युद्धाचा पाचवा आठवडा! फिलिपिन्समध्ये डिझेल ८१.६% तर नायजीरियात ७८% महागले. जागतिक इंधन टंचाई आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा सविस्तर अहवाल वाचा.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, इंधन संकटाने भीषण रूप धारण केले आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम डिझेलच्या किमतींवर झाला असून, काही देशांमध्ये डिझेलचे दर तब्बल ८१ टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर महागाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

फिलिपिन्समध्ये डिझेलच्या किमतीत जगात सर्वाधिक म्हणजे ८१.६% वाढ झाली आहे. यापाठोपाठ नायजेरियामध्ये ७८.३%, मलेशियामध्ये ५७.९%, आणि सिंगापूरमध्ये ४४% दरवाढ नोंदवण्यात आली आहे. विकसित देशांनाही याचा फटका बसला असून, अमेरिकेत ४१.२% आणि जर्मनीमध्ये ३०.९% ने डिझेल महागले आहे. कच्चे तेल ११६ डॉलरवर गेले आहे. 

भारताची स्थिती काय?जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, भारताने मात्र आतापर्यंत आपल्या किरकोळ इंधन दरांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. रशियाकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा आणि सरकारच्या धोरणांमुळे भारतात डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. मात्र, औद्योगिक डिझेलच्या दरात प्रति लिटर २२ रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीचा अडथळाइराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला असून, तज्ज्ञांच्या मते युद्ध न थांबल्यास हा दर १५० डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. तसे झाल्यास जगाला भीषण आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, असा इशारा 'ब्लॅकरॉक'च्या सीईओनी दिला आहे.

युद्धाचा इंधनावर असा झाला परिणाम२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या पहिल्या स्ट्राईकनंतर हे युद्ध पेटले. इराणने त्याला मिसाईल हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे आणि तेल टँकर्सवर झालेले हल्ले यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाची शुद्धीकरण प्रक्रिया खर्चिक झाल्याने पेट्रोल आणि विशेषतः डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Global Fuel Price Surge: US-Iran Conflict Drives Diesel Costs Up

Web Summary : US-Iran tensions ignite global fuel crisis, diesel prices soar up to 81% in some nations. Philippines, Nigeria hit hardest. India relatively stable due to Russian oil and government policies, but industrial diesel costs are rising. Economic recession looms if conflict escalates.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध