शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन राजकारणातील 'कोल्ड वॉर' दावोसमध्ये! ट्रम्प प्रशासनाने गॅविन न्यूसम यांना भाषणापासून रोखले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:20 IST

Gavin Newsom Davos Trump News: कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनावर दावोस परिषदेत दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 'USA House' मध्ये त्यांना प्रवेश नाकारल्याने वाद पेटला आहे.

दावोस/कॅलिफोर्निया: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अमेरिकन राजकारणातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कॅलिफोर्नियाचे डेमॉक्रॅटिक गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी खळबळजनक आरोप केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दबाव टाकून त्यांना 'USA House' मधील एका नियोजित कार्यक्रमात बोलण्यापासून रोखले आहे.

गॅविन न्यूसम यांना 'फॉर्च्युन' मासिकाने एका 'फायरसाइड चॅट'साठी (संवाद सत्रासाठी) अधिकृत पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम अमेरिकेच्या अधिकृत पॅव्हेलियनमध्ये होणार होता. मात्र, न्यूसम यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

न्यूसम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर संताप व्यक्त करताना म्हटले की, "कॅलिफोर्निया हा अमेरिकेचाच भाग आहे. एका संवादाला इतके घाबरणे हे अत्यंत कमकुवतपणाचे लक्षण आहे."

ट्रम्प प्रशासनाचे प्रत्युत्तरन्यूसम यांच्या आरोपांवर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी न्यूसम यांना 'थर्ड रेट गव्हर्नर' (दुय्यम दर्जाचे गव्हर्नर) संबोधले आणि म्हटले की, "कॅलिफोर्नियातील स्वतः निर्माण केलेल्या समस्या सोडवण्याऐवजी ते स्वित्झर्लंडमध्ये काय करत आहेत, हे कोणालाही माहित नाही."

वादाची पार्श्वभूमीगॅविन न्यूसम हे ट्रम्प यांच्या धोरणांचे कट्टर टीकाकार मानले जातात. विशेषतः ट्रम्प यांची 'ग्रीनलँड' ताब्यात घेण्याची मागणी आणि हवामान बदलाबाबतची धोरणे यावर न्यूसम यांनी दावोसमध्ये कडक टीका केली होती. याच टीकेचा वचपा काढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने त्यांना रोखल्याचा दावा केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Davos: Trump administration allegedly blocked Newsom from speaking, sparking political feud.

Web Summary : California Governor Gavin Newsom claims the Trump administration blocked him from speaking at a Davos event. The White House refuted this, calling Newsom a 'third-rate governor.' The dispute stems from Newsom's criticism of Trump's policies.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प