येमेनमधील हल्ल्यात चार भारतीय नन्स ठार

By Admin | Updated: March 5, 2016 02:43 IST2016-03-05T02:43:09+5:302016-03-05T02:43:09+5:30

कोलकाता येथील मिशनरीज आॅफ चॅरिटीज्च्या वतीने अ‍ॅडेनमधील शेख ओथमॅन डिस्ट्रिक्टमध्ये चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय नन्ससह १६ जण ठार झाले.

Four Indian Nuns killed in Yemen attack | येमेनमधील हल्ल्यात चार भारतीय नन्स ठार

येमेनमधील हल्ल्यात चार भारतीय नन्स ठार

अ‍ॅडेन/नवी दिल्ली : कोलकाता येथील मिशनरीज आॅफ चॅरिटीज्च्या वतीने अ‍ॅडेनमधील शेख ओथमॅन डिस्ट्रिक्टमध्ये चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय नन्ससह १६ जण ठार झाले.
सहा हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकाला आम्ही आमच्या आईला भेटायला आलो आहोत, असे सांगून वृद्धाश्रमाचे प्रवेशद्वार उघडायला सांगितले. प्रवेश करताच आधी त्यांनी सुरक्षारक्षकाला गोळ्या घालून ठार मारले व नंतर वृद्धांवर बेछूट गोळीबार केला, असे जिबुती येथे असलेल्या भारतीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. हल्ला दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला व लगेचच ते तेथून पसार झाले. दोन हल्लेखोरांनी वृद्धाश्रमाला वेढून घेतले तर आणखी चार बंदूकधाऱ्यांनी इमारतीत प्रवेश केला. त्यांनी एकेका खोलीत जाऊन तेथील लोकांना हातकड्या घातल्या व डोक्यात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात एक नन वाचली. या वृद्धाश्रमात ८० जण राहायला होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Four Indian Nuns killed in Yemen attack