शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा माजी लष्करी अधिकारी नेपाळमधून गायब; भारतावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 11:30 IST

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव व्यवसायानिमित्त अफगाणिस्तानात गेले असता पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेत कथितरित्या हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती.

इस्लामाबाद : काश्मीर मुद्द्यावरून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने नेपाळमधून कथितरित्या बेपत्ता झालेल्या माजी लष्करी अधिकाऱ्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानने अडीच वर्षांपूर्वी झालेले हे बेपत्ता प्रकरण बुधवारी पुन्हा उकरून काढले. 

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव व्यवसायानिमित्त अफगाणिस्तानात गेले असता पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेत कथितरित्या हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्य़ायप्रविष्ठ आहे. याच काळात पाकिस्तानचा एक माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल हबीब जहीर हा एप्रिल 2017 मध्ये नेपाळमधून बेपत्ता झाले होते. यामागे शत्रूराष्ट्राच्या एजन्सीचा हात असल्याचा आरोप आता पाकिस्तानने केला आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय मीडिया आणि ट्विट्सनुसार हबीब भारताच्या कोठडीमध्ये असू शकतो. कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात त्याला सोडले जाऊ शकते, असे वाटते. हबीब पाकिस्तानी लष्कराचे एक निवृत्त अधिकारी आहेत. एका नोकरीच्या मुलाखतीसाठी नेपाळमध्ये गेले असता ते तेथून गायब झाले आहेत. यामागे शत्रू राष्ट्रांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. तसेच हबीब घरी परतेपर्यंत पाकिस्तान सरकार शांत बसणार नसल्याचेही तो म्हणाला.

अडीज वर्षांनंतर पाकिस्तान अचानक भारतावर आरोप लावत आहे. यामुळे हाही एक त्यांच्या कुरघोड्यांचा भाग असल्याचा संशय बळावला आहे. कारण जाधव यांच्या बदल्यात हबीब यांच्या सुटकेच्या भारतीय मिडीयाचे अहवालांकडे बोट दाखविले जात आहे. जेव्हा जाधव यांना 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आरोप केला होता की हबीब यांना नोकरीच्या आमिषाने जाळ्यात अडकविण्यात आले. त्यांना भारतीय सीमेरेषेजवळील लुंबिनीयेथून गायब करण्यात आल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान