अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्चमध्ये गोळीबार; ९ ठार

By Admin | Updated: June 19, 2015 03:24 IST2015-06-19T03:24:14+5:302015-06-19T03:24:14+5:30

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना प्रांतातील चार्ल्सटन येथील कृष्णवर्णीय चर्चमध्ये एका गौरवर्णीय व्यक्तीने गोळीबार केला असून पोलिसांच्या मते

Firing in the Black Church in America; 9 killed | अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्चमध्ये गोळीबार; ९ ठार

अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्चमध्ये गोळीबार; ९ ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना प्रांतातील चार्ल्सटन येथील कृष्णवर्णीय चर्चमध्ये एका गौरवर्णीय व्यक्तीने गोळीबार केला असून पोलिसांच्या मते वर्णभेदातून हा हल्ला झाला आहे.
चार्ल्सटनचे पोलीस प्रमुख ग्रेग मुलेन यांनी पत्रकार परिषदेत या हल्ल्याची माहिती दिली असून, गौरवर्णीय हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात ९ जण ठार झाल्याचे सांगितले आहे. चार्ल्सटन येथील ऐतिहासिक इमॅन्युअल आफ्रिकन मेथाडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये हा गोळीबार झाला. हा गोळीबार वर्णभेदातून झाला,असे मुलेन म्हणाले.
गोळीबार करणारा गौरवर्णीय युवक २० वर्षांचा असून, सडपातळ होता. त्याने स्वच्छ दाढी केली होती व करड्या रंगाचा स्वेटर, जीन्स आणि बूट असा त्याचा पोशाख होता. गोळीबारात आठ लोक चर्चमध्येच मरण पावले असून, एकजण रुग्णालयात मरण पावला आहे. चर्चचे पास्टर व सिनेटर क्लेमेंटा पिनेकी यांचाही मृतात समावेश आहे. त्यांच्या पश्चात पत्नी जेनिफर व दोन मुले इलियाना व मलाना आहेत. 

Web Title: Firing in the Black Church in America; 9 killed