अमेरिकेत गोळीबार; १४ ठार, २० जखमी

By Admin | Updated: December 3, 2015 05:12 IST2015-12-03T05:03:27+5:302015-12-03T05:12:17+5:30

येथील सॅन बॅर्नार्डिनोमध्ये तीन अज्ञात बंदुकधा-यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत.

Firing in America; 14 killed, 20 injured | अमेरिकेत गोळीबार; १४ ठार, २० जखमी

अमेरिकेत गोळीबार; १४ ठार, २० जखमी

>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. ३ -   येथील सॅन बॅर्नार्डिनोमध्ये तीन अज्ञात बंदुकधा-यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. 
लॉस एंजेलिसपासून ६० मैलांवर असलेल्या  सॅन बॅर्नार्डिनो येथील इनलॅन्ड रिजनल सेंटरच्या परिसरात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास तीन अज्ञात बंदुकधा-यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोऴीबारात १४ जण ठार झाल्याचे तर २० जण जखमी झाल्याची माहिती कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हल्लेखोर अद्याप सापडले नसून याच परिसरात आहेत, त्यामुळे गोऴीबार होत असलेल्या ठिकाणी लोकांना जाण्यास पोलिसांनी मनाई केली असून या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच, जखमींना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Firing in America; 14 killed, 20 injured