Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:03 PM2021-05-31T17:03:53+5:302021-05-31T17:16:12+5:30

Corona Virus News : हा इशारा अमेरिकेच्या (America) तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे.

Find Covid-19 Origin Or Face "Covid-26 And Covid-32", Warn US Experts | Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देयाबाबत चीनने जागतिक आरोग्य संघटनेलाही (WHO) माहिती देण्यास नकार दिला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा कोरोना कोठून आला? यावरून पुन्हा जगभरात चर्चा सुरू असून चिंताही वाढली आहे. अमेरिकेतील मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, कोरोना उत्पत्तीच्या अनुषंगाने अमेरिकेतील दोन तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19ची (Covid-19) ची उत्पत्ती कुठे झाली याचा शोध लावणे गरजेचे आहे. अन्यथा कोविड-26 (Covid-26), कोविड-32 (Covid-32) यांचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. (Find Covid-19 Origin Or Face "Covid-26 And Covid-32", Warn US Experts)

हा इशारा अमेरिकेच्या (America) तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे. स्कॉट गॉटलीब हे सध्या फायझर या औषध कंपनीच्या बोर्डचे सदस्य आहेत. स्कॉट गॉटलीब, पीटर होट्स यांनी सांगितले की, कोविड -19च्या उत्पत्ती बाबत आणि भविष्यातील महामारीचा (Pandemic) उद्रेक रोखण्यासाठी चीन सरकारने जगाला मदत केली पाहिजे. 

स्कॉट गॉटलीब म्हणाले की, चीनमधील वुहान लॅबमधून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली असल्याच्या थेअरीबाबत अधिक सबळ पुरावे मिळाले आहेत. मात्र ही थिअरी चुकीची असल्याचे सिद्ध करण्यासाठी चीनने अद्याप सबळ पुरावे दिलेले नाहीत. तर पीटर होट्स यांनी सांगितले की, कोरोना ज्या प्रकारे पसरला, त्यामुळे भविष्यात साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. मात्र ही बाब अजूनही जगाच्या लक्षात येत नाही आहे.


वुहान (Wuhan) येथून कोरोना विषाणूचा प्रसार लीक झाला असल्याची बाब चीन (China)नाकारत असला, तरी याबाबतचे पुरावे अधिक सबळ होताना दिसत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी चिनी लष्कराच्या हालचालींमध्ये वुहान येथील प्रयोगशाळा (Lab) सहभागी असल्याचा दावा केला आहे. या लॅबमध्ये नागरी संशोधनाच्या नावाखाली चिनी लष्कराशी संबंधित कृती, हालचाली केल्या जात आहेत, असे माइक पोम्पियो यांनी म्हटले आहे. तर याबाबत चीनने जागतिक आरोग्य संघटनेलाही (WHO) माहिती देण्यास नकार दिला आहे.

Web Title: Find Covid-19 Origin Or Face "Covid-26 And Covid-32", Warn US Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.