Camel Flu : संकटं संपता संपेना! जीवघेण्या 'कॅमल फ्लू'चा मोठा धोका; 'असा' पसरतोय आजार, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:45 PM2022-12-12T19:45:59+5:302022-12-12T19:57:43+5:30

Camel Flu : कतारहून परतणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना डॉक्टरांनी कडक इशारा दिला आहे. परतणारे चाहते हे उंटांमध्ये आढळणारा घातक 'कॅमल फ्लू' पसरवू शकतात असं म्हटलं आहे.

fifa world cup news uk doctors warned on deadly camel flu as football fans return from qatar | Camel Flu : संकटं संपता संपेना! जीवघेण्या 'कॅमल फ्लू'चा मोठा धोका; 'असा' पसरतोय आजार, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Camel Flu : संकटं संपता संपेना! जीवघेण्या 'कॅमल फ्लू'चा मोठा धोका; 'असा' पसरतोय आजार, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

googlenewsNext

कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी जगभरातून लाखो फुटबॉल चाहते येत आहेत. याच दरम्यान, कतारहून परतणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना डॉक्टरांनी कडक इशारा दिला आहे. परतणारे चाहते हे उंटांमध्ये आढळणारा घातक 'कॅमल फ्लू' पसरवू शकतात असं म्हटलं आहे. एवढेच नाही तर ब्रिटनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कतारहून परतणार्‍या लोकांबद्दल अत्यंत सतर्क राहा असं देखील सांगण्यात आले आहे.

फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी आखाती देशांतून परतणाऱ्या चाहत्यांच्या मार्फत उंटांच्या संपर्कातून पसरणाऱ्या फ्लूच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने डॉक्टरांना श्वास घेण्यास त्रास आणि ताप असलेल्या लोकांना ओळखण्याबाबत सतर्क केले आहे. कॅमल फ्लू हा कोरोना व्हायरसपेक्षा जास्त घातक मानला जातो. याचा त्रास होणाऱ्या लोकांपैकी किमान एक तृतीयांश लोकांचा मृत्यू होतो. तर कोरोनाने पीडित लोकांपैकी केवळ 4 टक्के लोकांचा मृत्यू होतो.

द सनच्या रिपोर्टनुसार, हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने पाठवलेल्या मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, आरोग्य कर्मचारी आणि सार्वजनिक आरोग्य पथकांनी विशेषत: कतारहून परतणाऱ्या प्रवाशांमध्ये मर्स व्हायरसचा प्रसार होण्याच्या शक्यतेबाबत सतर्क राहावे. ब्रिटनमधील लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे परंतु उंटांच्या संपर्कात येणाऱ्यांमध्ये तो अधिक असू शकतो. एजन्सीने सांगितले की, मर्स व्हायरस उंटांच्या संपर्कात आल्याने किंवा उंटाच्या उत्पादनांचे सेवन केल्याने पसरतो. यामध्ये उंटाच्या दुधाचाही समावेश आहे.

MERS व्हायरस हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, असेही या इशाऱ्यात म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की या वर्षी कतारमध्ये MERS विषाणूची दोन प्रकरणे आधीच आढळून आली आहेत. हे दोन्ही लोक उंटांच्या संपर्कात आले होते. एप्रिल 2012 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत, 12 आखाती देशांमध्ये MERS व्हायरसची 2600 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 935 जणांचा मृत्यू झाला आहे. हे एकूण प्रमाणाच्या जवळपास 36 टक्के आहे. MERS व्हायरस असलेल्या काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तथापि, इतरांमध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, जुलाब आणि उलट्या झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: fifa world cup news uk doctors warned on deadly camel flu as football fans return from qatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.