CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:05 IST2021-05-05T20:03:47+5:302021-05-05T20:05:30+5:30
CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.

CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली
लंडन: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. (external minister s jaishankar says we realize that the world is with us)
जी-७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडन येथे गेले असून, कोरोनाची दुसरी लाट एक मोठे आव्हान असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. जागतिक पातळीवरून कोरोना संकटात मिळत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करत या संकटाच्या काळात संपूर्ण जग भारतासोबत असल्याची जाणीव आम्हांला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.
“परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल
निवडणुका अटळ, रोखू शकत नाही
भारतात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. यामुळे कोरोनाचा कहर वाढल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात जयशंकर यांनी भाष्य केले. निवडणुका अटळ आहेत. भारत एक लोकशाही मानणारा देश आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका नाही, असे होऊ शकत नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
आरोग्य व्यवस्था कोलमडली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातून मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र, ती वेळ आता भारतावर आली आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.
देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा
परकीय मदतीबाबत आभार
ब्रिटन, अमेरिका, आखाती देशांनी भारताला वैद्यकीय तसेच अन्य गोष्टींमध्ये अत्यंत उपयुक्त मदत केली, याबाबत सर्व देशांचा भारत आभारी आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे असून, यामुळे वैचारिक पातळी आणि विचारांमध्ये नक्कीच बदल घडेल, असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.