CoronaVirus: “परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:30 PM2021-05-05T17:30:06+5:302021-05-05T17:34:06+5:30

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जाब विचारला असून, ५ प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हटले आहे.

coronavirus congress rahul gandhi asked 5 questions to center govt about foreign aid | CoronaVirus: “परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

CoronaVirus: “परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

Next
ठळक मुद्देराहुल गांधींची केंद्र सरकारला विचारणापरदेशातून आलेल्या मदतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्हभारत सरकारकडे प्रश्नांची उत्तरे आहेत का - राहुल गांधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातील अनेक व्यक्ती, संघटनांनी भारताला कोरोनाच्या संकटात मोठी मदत केली. यावरून आता काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जाब विचारला असून, ५ प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हटले आहे. (coronavirus congress rahul gandhi asked 5 questions to center govt about foreign aid)

राहुल गांधींना अलीकडे कोरोना झाल्याची माहिती मिळाली होती. राहुल गांधी गृह विलगीकरणात असून, ट्विटरवरून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. परदेशातून भारताला मिळालेल्या मदतीवरून राहुल गांधी यांनी भारत सरकारला ५ प्रश्न विचारले असून, यासंदर्भात काही उत्तरे आहेत का, अशी विचारणा केली आहे. 

परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?

आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला?, त्या गोष्टी कुठे आहेत?, त्याचा फायदा कोणाकोणाला होत आहे? त्यांचे राज्यांना कशा पद्धतीने वाटप झाले आहे? या सगळ्यात पारदर्शकता का नाही?, असे ५ प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत. भारत सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशासमोर आता लॉकडाउन करण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही, असे राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटले होते. 

देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  

कडक लॉकडाऊन अनिवार्य

वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे. देशात आताच्या घडीला रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणे आणि मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर देण्याची आवश्यकता आहे. आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होऊ शकते, असे एम्सचे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले. 

“भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...”

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठे नुकसान केले, अशी कठोर टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.
 

Web Title: coronavirus congress rahul gandhi asked 5 questions to center govt about foreign aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.