एव्हरेस्ट पर्वत ३ सें.मी.सरकला

By Admin | Updated: June 17, 2015 05:13 IST2015-06-17T02:40:54+5:302015-06-17T05:13:11+5:30

नेपाळमधील २५ एप्रिलच्या भीषण भूकंपाने जगातील सर्वोच्च शिखर गणल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट पर्वतालाही धक्का दिला असून हा पर्वत

Everest Mountain 3cm | एव्हरेस्ट पर्वत ३ सें.मी.सरकला

एव्हरेस्ट पर्वत ३ सें.मी.सरकला

बीजिंग : नेपाळमधील २५ एप्रिलच्या भीषण भूकंपाने जगातील सर्वोच्च शिखर गणल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट पर्वतालाही धक्का दिला असून हा पर्वत नैऋत्येला सरकल्याचे वृत्त आता पुढे आले आहे. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपामुळे एव्हरेस्ट नैऋत्येकडे ३ सें.मी. सरकला आहे. चीनच्या चायना डेली या वृत्तपत्राने एव्हरेस्ट सरकल्याचे वृत्त नॅशनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ सर्व्हेइंग, मॅपिंग व जिओइन्फॉर्मेशन या संस्थेचा हवाला देत प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, २५ एप्रिलच्या भीषण भूकंपानंतर एव्हरेस्ट पर्वतात हिमदरडी कोसळून १८ गिर्यारोहकांचा बळी गेला होता. त्याचवेळी तेथील बेसकॅम्पही उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर नेपाळने एव्हरेस्टवरील गिर्यारोहण वर्षभर बंद ठेवले आहे. (वृत्तसंस्था)

काही दशकात उंचीही वाढली
-नेपाळमध्ये २५ एप्रिलचा जबरदस्त भूकंप होण्याआधी एव्हरेस्ट पर्वत ईशान्येकडे म्हणजेच विरुद्ध दिशेला सरकत असल्याचे वृत्त होते.
-गेल्या काही दशकात एव्हरेस्ट पर्वत दरवर्षी ४ सें.मी. या गतीने ४० सें मी. नैऋत्येकडे सरकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत एव्हरेस्टची उंचीही ३ सें. मी. ने वाढली आहे. भूकंपाच्या धक्क्याने एव्हरेस्ट पर्वत ईशान्येऐवजी नैऋत्येकडे सरकला आहे.

Web Title: Everest Mountain 3cm