शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 05:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

माले : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला ४,८५० कोटी रुपयांची कर्ज सुविधा देण्याची घोषणा करून बेटांचा समूह असलेले हे राष्ट्र सर्वात विश्वासू मित्र असल्याचा भारताला अभिमान असल्याचे नमूद केले. मालदीवची संरक्षण क्षमता अधिक भक्कम व्हावी यासाठी भारत सातत्याने समर्थन देईल, असे मोदींनी म्हटले. विद्यार्थ्यांनी केले स्वागतसकाळी मोदी माले येथे दाखल झाल्यावर त्यांचे अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. स्वत: मुईज्जू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी मोदी यांचे वेलेना विमानतळावर स्वागत केले. यानंतर रिपब्लिक स्वेअरवर त्यांचे औपचारिक स्वागत करून सलामी देण्यात आली. चीनच्या प्रभावातून बाहेर काढण्याचे प्रयत्नभारत आऊट’ मोहिमेच्या प्रचारानंतर सत्तेत आलेले मुईज्जू यांनी नंतरच्या काळात आपल्या देशातून भारतीय सैनिकांना परत बोलावण्याचे आवाहन केले होते. आता मालदीवची चीनशी वाढलेली सलगी पाहता या प्रभावातून बाहेर काढून नवे संबंध तयार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.मैत्री नवी उंची गाठेलमोदींनी स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत दोन्ही देशांतील मैत्री नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. संबंधांत सुधारणा दोन्ही देशांतील परस्पर संबंधांत झालेल्या सुधारणांबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी हा सकारात्मक विचारांचा परिणाम असल्याचे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaldivesमालदीव