२१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख

By मोरेश्वर येरम | Published: December 13, 2020 04:48 PM2020-12-13T16:48:10+5:302020-12-13T16:49:54+5:30

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे.

end of the world on June 21 2020 after this false prediction researchers now announce a new date | २१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख

२१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख

googlenewsNext

दोन आठवड्यांनी २०२० हे वर्ष संपेल. या वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना खूप अपेक्षा होत्या. पण या वर्षात आपल्याला जागतिक महामारीला सामोरं जावं लागेल, अशी वर्षाच्या सुरुवातीला कुणीही कल्पना केली नसेल. कोरोनावर अद्याप कोणतही कायमस्वरुपी औषध आलेलं नाही.

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे. या वर्षात अनेक उल्का पृथ्वीच्या जवळून गेल्याचं पाहायला मिळालं. २१ जून २०२० रोजी पृथ्वी नष्ट होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण माया कॅलेंडरने वर्तवलेली ही भविष्यवाणी अखेर खोटी ठरली. आता संशोधकांनी पृथ्वी नष्ट होण्याची नवी तारीख सांगितली आहे. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात सरसरी ३ डिग्री सेल्सियसने वाढ होणार आहे. यामुळे पृथ्वीवरील मनुष्यवस्ती नष्ट होऊ शकते. जयवायू परिवर्तनामुळे २०५० मध्ये पृथ्वीवर संकट कोसळण्याची शक्यता आहे.  

२०५० पर्यंत कृषी उत्पादनाचा पाचव्या हिस्सा देखील नष्ट होऊन जाईल. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असेल आणि समुद्राच्या पातळीत ०.५ मीटरने वाढ झालेली असेल. आशियातील सर्व मोठ्या नद्या कोरड्या पडतील आणि पृथ्वीच्या एक तृतियांश भागाचे वाळवंट झालेलं असेल.  
इतकंच नव्हे, तर 'फादर ऑफ मॉर्डन सायन्स' म्हणून ओळख असलेल्या विख्यात शास्त्रज्ञ न्यूटन यानेही मृत्यूपूर्वी  लिहीलेल्या एका पत्रात २०६० पर्यंत पृथ्वी नष्ट झालेली असेल, असं नमूद केलं होतं. मनुष्याला जर वाटत असेल की तो अजरामर राहील तर ती त्याची चूक आहे. २०६० मध्ये सारंकाही नष्ट झालेलं असेल, असं न्यूटनने पत्रात लिहीलं होतं. 
 

Web Title: end of the world on June 21 2020 after this false prediction researchers now announce a new date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.