ओमन-दुबई बस अपघातात आठ भारतीयांसह 17 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:19 IST2019-06-07T11:19:39+5:302019-06-07T11:19:49+5:30

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ओमनहून येणारी बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे.

eight indians among 17 killed in fatal bus crash in dubai | ओमन-दुबई बस अपघातात आठ भारतीयांसह 17 जणांचा मृत्यू 

ओमन-दुबई बस अपघातात आठ भारतीयांसह 17 जणांचा मृत्यू 

दुबईः संयुक्त अरब अमिरातीमध्ये ओमनहून येणारी बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. शुक्रवारी भारताच्या वाणिज्य दूतावासानं याची खातरजमा केली आहे. दुबईत बस अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. वाणिज्य दूतावास काही मृतांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. तर इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून इतर कुटुंबीयांना याची कल्पना देता येईल, असंही भारतीय वाणिज्य दूतावासानं स्पष्ट केलं आहे.

ओमनची सरकारी बस कंपनी असलेल्या वासालातनं म्हटलं आहे की, मस्कटहून दुबईच्या मार्गे जाणारी बस काल संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान अपघातग्रस्त झाली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बस अपघातात जखमी असलेल्या चार भारतीयांना उपचारानंतर घरी पाठवलं आहे.


तर तिघांवर राशीद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबई पोलिसांनी मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ही बस शेख मोहम्मद बिन जायद रोडच्या साइन बोर्डाला धडकली, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: eight indians among 17 killed in fatal bus crash in dubai