शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:48 IST

Donald Trump vs Kamala Harris, US Presidential Election 2024: ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस हळूहळू आगेकूच करत २१० जागांपर्यंत पोहोचल्या आहेत

Donald Trump vs Kamala Harris, US Presidential Election 2024: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या विरोधात मोठी आघाडी घेतली. ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस हळूहळू आगेकूच करत २१० जागांपर्यंत पोहोचल्या आहेत. अमेरिकेतील (America) अनेक राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्याचा अंदाज आहे. निवडणुकीचे अंतिम निकाल यायला वेळ लागणार असला तरी, आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प यांच्या आघाडीत ग्रामीण अमेरिकन विभागांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे.

कमला हॅरिस यांच्या कामगिरीत सुधारणा नाही

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जिंकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याचे प्रमुख कारण म्हणजे २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या तुलनेत पारंपारिक ग्रामीण भागात ट्रम्प यांची यंदाची कामगिरी खूपच चांगली दिसत होती. कमला हॅरिस यांनी शहरी आणि उपनगरीय काउंटींमध्ये सरासरी मते घेत, बायडेन यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. तर २०२०च्या कामगिरीच्या तुलनेत यंदा या भागात कमला हॅरिस यांच्या पक्षाने कोणतीही लक्षणीय सुधारणा केलेली नाही. यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

४० राज्यांचे निकाल हाती, ट्रम्प यांची आघाडी कायम

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ५० पैकी आता केवळ १० राज्यांमध्ये मतमोजणी बाकी आहे. आतापर्यंत ४० राज्यांचे निकाल आले आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प २५ तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस १५ जागांवर विजयी झाले आहेत. ट्रम्प हे बहुमतापासून अवघ्या ४० जागा दूर आहेत. त्यांना ५३८ जागांपैकी २३० जागा मिळाल्या आहेत. तर कमला यांना २१० जागा मिळाल्या आहेत. दोघांमधील फरक केवळ २० जागांचा आहे. मात्र, उर्वरित १० पैकी ५ राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. तर २ मध्ये अद्याप मतमोजणी सुरू झालेली नाही. त्यामुळे चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या या लढतीत कमला हॅरिस सध्या पराभवाच्या छायेत आहेत.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिका