शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:07 IST

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी म्हटले होते की, कोका-कोलाने त्यांच्या कोलामध्ये उसाची साखर वापरण्यास सहमती दर्शविली आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी अखेर कामी आली आहे. त्यांनी कोका-कोला कंपनीला कोकमध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरपऐवजी उसाची साखर वापरण्यास सांगितले होते. कंपनीने यावर सहमती दर्शविली आहे. कोका-कोला उसाच्या साखरेपासून बनवलेला एक नवीन कोक लाँच करणार आहे. 

तत्पूर्वी, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दावा केला होता की त्यांनी कोका-कोलाला हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप बदलण्यास राजी केले आहे. दरम्यान आता कंपनीचे म्हणणे आहे की, ते लवकरच उसाच्या साखरेपासून बनवलेला कोक लाँच करणार आहेत. खरे तर, कंपनी आधीच अनेक देशांमध्ये उसाची साखर वापरते. मात्र, आता अमेरिकेत पहिल्यांदाच कोकमध्ये उसाची साखर वापरली जाणार आहे.

या नवीन कोकमुळे लोकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. लोक त्यांच्या आवडीनुसार ते निवडू शकतील. कंपनीचे सीईओ जेम्स क्विन्सी यांनी आशा व्यक्त केली आहे की, लोकांना हे पेय आवडेल. तसेच, कोका-कोला अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या इतर अनेक पेयांमध्येही उसाची साखर वापरते. यांत, लिंबूपाणी आणि कॉफीचा समावेश आहे. आमची वेगवेगळे स्वीटनर वापरण्याची इच्छा आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडीची चव मिळेल, असेही क्विन्सी यांनी म्हटले आहे.

रेसिपी बदलणार नाही -गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी म्हटले होते की, कोका-कोलाने त्यांच्या कोलामध्ये उसाची साखर वापरण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, कंपनीने म्हटले होते की, कोका-कोलाची मूळ रेसिपी बदलणार नाही. त्यात उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरपच वापरला जाईल. कंपनी उसाच्या साखरेपासून बनवलेला वेगळा कोक तयार करेल.

ट्रम्प प्रशासनाचे हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेस सेक्रेटरीरॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर हे उच्च-फ्रुक्टोज कॉर्नच्या विरोधात आहेत. अमेरिकेतील अन्नपदार्थांमधून कृत्रिम आणि प्रक्रिया केलेल्या गोष्टी काढून टाकायला हव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प