“मोजतबा खामेनी जिवंत नाहीत, असतील तर…”; इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:00 IST2026-03-15T09:56:35+5:302026-03-15T10:00:16+5:30

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोजतबा खामेनी यांच्या जिवंत असण्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

donald trump big claim about iran supreme leader that mojtaba khamenei is not alive if he is then should surrender | “मोजतबा खामेनी जिवंत नाहीत, असतील तर…”; इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा

“मोजतबा खामेनी जिवंत नाहीत, असतील तर…”; इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा

Donald Trump News: इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाच्या खार्ग बेटावरील सर्व लष्करी ठिकाणे अमेरिकेने बॉम्बहल्ले करून नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या हल्ल्यात १५ स्फोट झाल्याचे इराणच्या 'फार्स' या वृत्तसंस्थेने सांगितले. तर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीत अडथळे आणणे सुरूच ठेवले तर पुढील कारवाईत तेल रिफायनरी, तेलसाठ्यांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. इराण युद्धाबाबत ट्रम्प एकामागून एक अनेक दावे करत आहेत. यातच इराणच्या सर्वोच्च नेत्याबाबतही ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. 

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा सुपूत्र मोजतबा खामेनी यांनी इराणची सूत्रे हाती घेतली. परंतु, युद्ध काळात मोजतबा खामेनी जाहीररित्या कधी समोर आले नाहीत. अलीकडेच एका हल्ल्यात मोजतबा खामेनी जखमी झाल्याचेही म्हटले जात होते. हा दावा इराणने फेटाळला होता. काही मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजतबा खामेनी यांच्या जिवंत असण्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

एकदाही सार्वजनिकरित्या दिसले नाहीत

मोजतबा खामेनी एकदाही सार्वजनिकरित्या दिसले नाहीत. ५६ वर्षीय नेते मोजतबा खामेनी जिवंत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. सत्ता हाती आल्यानंतर खामेनी यांचा पहिला संदेश जाहीरपणे न देता लेखी देण्यात आला होता. ते जिवंत आहेत की नाही, हेदेखील माहिती नाही. आतापर्यंत ते समोर आलेले नाहीत. मी असे ऐकले आहे की, खामेनी जिवंत नाहीत. जर ते जिवंत असतील तर त्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी खूप महत्त्वाचे केले पाहिजे. ते म्हणजे आत्मसर्पण, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी युद्धाची स्थिती आता स्पष्ट होत आहे. इराण लवकरच शरण येईल, असे विधान ट्रम्प यांनी केले होते. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनानंतरही चीन आणि ब्रिटनने होर्मुजच्या सामुद्रधुनीत आपल्या युद्धनौका तैनात करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. यामुळे अमेरिकेच्या जागतिक आवाहनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, होर्मुजची सामुद्रधुनी केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांसाठी बंद राहील. या दोन देशांव्यतिरिक्त जगातील इतर सर्व देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची पूर्ण परवानगी आहे, असे इराणने स्पष्ट केले आहे. 

 

 

Web Title : ट्रंप का दावा: ईरानी नेता खामेनी शायद मृत या छिपे हुए हैं

Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने ईरानी नेता खामेनी के ठिकाने पर सवाल उठाते हुए कहा कि शायद वो मर चुके हैं या छिपे हुए हैं। ट्रंप ने ईरानी तेल सुविधाओं पर हमलों का भी दावा किया। चीन और ब्रिटेन ने युद्धपोत तैनात करने के आह्वान को खारिज कर दिया।

Web Title : Trump Claims Iranian Leader Khamenei May Be Dead or In Hiding

Web Summary : Donald Trump questioned the whereabouts of Iranian leader Khamenei, suggesting he might be dead or in hiding. Trump also claimed attacks on Iranian oil facilities. China and Britain rejected calls to deploy warships.