शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 07:18 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट पणे कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत असं सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले.

वॉश्गिंटन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिलेत. ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश असू शकतो. अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात स्वस्त दरातील परदेशी वस्तूंमुळे अमेरिकन उत्पादकांना नुकसान पोहचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार,टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ बिलियन डॉलर पॅकेजची घोषणा करण्यात आली. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका गोलमेज परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि कॅनडा यांच्यावर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. काही देश अमेरिकन बाजारपेठेत कमी दरात तांदूळ टाकत असल्याचा आरोप होत आहे. सरकार त्या आरोपांची पडताळणी करणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलं. बैठकीला असणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर कठोर कारवाईसाठी दबाव टाकला. बाजारपेठेत कमी किंमतीत परदेशी तांदूळ येत असल्याने अमेरिकन बाजारावर त्याचा परिणाम होत आहे. घरगुती वस्तूच्या किंमती त्यामुळे घसरत असल्याचा तर्क त्यांनी लावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट पणे कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत असं सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. कॅनेडियन आयात खतांवरही टॅरिफ लावला जाऊ शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलं. लुइसियाना येथे कॅनेडी राइस मिलच्या सीईओ मेरिल कॅनेडी यांनी बैठकीत डंपिंग करणाऱ्या देशांमध्ये भारत, थायलँड आणि चीन असल्याचे सांगितले. चीन तांदूळ थेट अमेरिकेत नाही तर प्यूर्टो रिकोला पाठवत आहे. ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत तांदूळ उत्पादकांवर संकट ओढावले आहे. टॅरिफमुळे काही प्रमाणात चाप बसला आहे परंतु आपल्याला ते दुप्पट करण्याची गरज आहे असंही बैठकीत मेरिल कॅनेडी यांनी ट्रम्प यांच्याकडे मागणी केली.

दरम्यान, भारताला अमेरिकेत तांदूळ विक्री करण्याची परवानगी आहे का असं ट्रम्प यांनी सहकारी मंत्र्‍याला विचारले. त्यावर नाही, आपण अजून त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करत आहोत असं उत्तर मिळाले. त्यानंतर कॅनेडी यांनी भारत कशाप्रकारे बेकायदेशीर सब्सिडीसोबत तांदूळ उद्योग करत असल्याचं सांगितले. भारतासोबत थायलँड आणि चीनही यांच्यावर बैठकीत नाराजीचा सूर निघाला. लवकरच या प्रकरणात कारवाई केली जाईल असं आश्वासन ट्रम्प यांनी शेतकऱ्यांना दिले. विशेष म्हणजे हा प्रकार अशावेळी उघडकीस आला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका दोघेही त्यांच्या आर्थिक संबंधांना स्थिर करण्यासाठी व्यापारी करारावर भर देत आहेत. ट्रम्प यांनी याआधी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump hints at doubling tariffs on Indian rice after complaints.

Web Summary : Trump considers doubling tariffs on Indian rice following US farmers' complaints of unfair competition. He also targeted Canadian fertilizers, alleging that subsidized imports hurt American producers. Further action is expected soon.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत