शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 13:50 IST

एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, पण सोशल मीडियावर मेसेज आणि मीम्सचा पाऊस पडतोय. 

ठळक मुद्देदाऊदचे खासगी कर्मचारी आणि रक्षकांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आज दाऊदच्या मृत्यूची चर्चांना उधाण आलं आहे.दाऊद इब्राहिमला कोरोना संक्रमित झाल्याच्या वृत्तास त्याचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी नाकारले आहे.

इस्लामाबाद - 1993च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेमागचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्यापाकिस्तानात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू आहे. एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, पण सोशल मीडियावर मेसेज आणि मीम्सचा पाऊस पडतोय. 

शुक्रवारी गुप्तचर यंत्रणांमार्फत दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांना कोरोना झाल्याची माहिती काल मिळाली होती. दाऊद आणि त्याची पत्नी यांना कराचीच्या मिलिटरी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं समजलं होतं. तसंच दाऊदचे खासगी कर्मचारी आणि रक्षकांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आज दाऊदच्या मृत्यूची चर्चांना उधाण आलं आहे.

 

अनीस म्हणाला- दाऊद स्वस्थ आहेदाऊद इब्राहिमला कोरोना संक्रमित झाल्याच्या वृत्तास त्याचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी नाकारले आहे. अनीस यांनी असा दावा केला की, त्याच्या भावासोबत कुटुंबातील सर्व सदस्य स्वस्थ आहेत आणि कोणालाही रुग्णालयात दाखल केले नाही. अनीस इब्राहिम दाऊदची डी-कंपनी चालविते.अनीस दाऊदचा व्यवसाय चालवितोवृत्तसंस्था आयएएनएसनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी अज्ञातस्थळावरून फोनवरून सांगितले की, दाऊदच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठीक आहेत. त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. अनीस युएईच्या लक्झरी हॉटेल आणि पाकिस्तानमधील मोठ्या बांधकाम प्रकल्प व्यतिरिक्त वाहतुकीचा व्यवसाय देखील चालवित आहे.१९९३ बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंडकुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार होता. या दहशतवादी घटनेत 13 बॉम्बस्फोट झाले होते ज्यात 350 लोक मरण पावले आणि 1200 हून अधिक लोक जखमी झाले. 2003 मध्ये भारत सरकारने अमेरिकेशी मिळून  दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले.पाकिस्तानी सैन्याने आश्रय दिलाभारतीय गुप्तचर यंत्रणांच्या भीतीने त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. कराची येथे पाकिस्तान लष्कर आणि आयएसआय त्याच्या संरक्षणाखाली तैनात आहेत. भारताने अनेक वेळा पुरावे सादर केल्यानंतरही पाकिस्तानने नेहमीच येथे दाऊद असल्याचे नाकारले आहे.

 

 

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

 

Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात हलवलं

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमcorona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानDeathमृत्यूTwitterट्विटर