अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत मोठा दावा केला आहे. इराणने 'सन्मानाचे प्रतीक' म्हणून अमेरिकेला कच्च्या तेलाने भरलेली २० मोठी जहाजे पाठवल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सध्या इराणच्या नियंत्रणाखाली असून, तेथे केवळ मित्र राष्ट्रांच्या जहाजांनाच सूट देण्यात आली आहे. असे असतानाच, ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आपले खासगी विमान 'एअर फोर्स वन'वरून पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "इराणने सन्मान दाखवत अमेरिकेसाठी २० मोठी तेलवाहू जहाजे पाठवली आहेत. ही प्रक्रिया उद्या सकाळपासून सुरू होईल आणि पुढील काही दिवस चालेल. सुरुवातीला ते केवळ १० जहाजे पाठवण्यास तयार होते, मात्र आता त्यांनी ही संख्या २० पर्यंत वाढवली आहे." तसेच, इराण आता करारासाठी आणि तडजोडीसाठी तयार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
चर्चेसोबतच लष्करी कारवाईही सुरू - ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका सध्या इराणसोबत थेट आणि दूतांमार्फत संवाद साधत आहे. मात्र, ही चर्चा सुरू असताना लष्करी कारवाईही सुरूच आहे. "आम्ही आज इराणची अनेक महत्त्वाची लक्ष्ये उद्ध्वस्त केली आहेत. त्यांचे नौदल आणि हवाईदल आता जवळपास पूर्णपणे नष्ट झाले आहे. आम्ही इराणशी बोलतही आहोत आणि गरजेप्रमाणे प्रहारही करत आहोत," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ओबामा यांच्या अणुकरारावर पुन्हा टीका -डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा २०१५ च्या अणुकरारावर निशाणा साधला. ते म्हणाले, बराक ओबामा यांच्या काळातील हा करार देशाच्या इतिहासातील 'सर्वात मूर्खपणाचा' सौदा होता. जर तो रद्द केला नसता, तर आज इराणकडे अण्वस्त्रे असती. यावेळी त्यांनी एका नवीन आणि कडक कराराची आवश्यकताही व्यक्त केली. जेणेकरून इराणच्या लष्करी क्षमतांवर संपूर्ण नियंत्रण मिळवता येईल.
Web Summary : Trump claims Iran, in a show of respect, is sending 20 oil tankers through Hormuz to the US. He suggests Iran is ready for negotiation while military actions continue. Trump criticized the 2015 nuclear deal, advocating for stricter controls on Iran's military capabilities.
Web Summary : ट्रंप का दावा है कि ईरान सम्मान दिखाते हुए अमेरिका को होर्मुज जलडमरूमध्य से 20 तेल जहाज भेज रहा है। उन्होंने संकेत दिया कि ईरान बातचीत के लिए तैयार है, लेकिन सैन्य कार्रवाई जारी है। ट्रंप ने 2015 के परमाणु समझौते की आलोचना की और ईरान की सैन्य क्षमताओं पर सख्त नियंत्रण की वकालत की।