मोदींना भेटल्याबद्दल शरिफांवर टीका

By Admin | Updated: December 6, 2015 23:03 IST2015-12-06T23:03:01+5:302015-12-06T23:03:01+5:30

पॅरिस येथील हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याबद्दल पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर ‘जमात उद दावा’चा प्रमुख हाफीज सईद याने टीका केली आहे.

The criticism of Sharif for meeting Modi | मोदींना भेटल्याबद्दल शरिफांवर टीका

मोदींना भेटल्याबद्दल शरिफांवर टीका

लाहोर : पॅरिस येथील हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याबद्दल पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर ‘जमात उद दावा’चा प्रमुख हाफीज सईद याने टीका केली आहे. पॅरिसमध्ये शरीफ यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी हसून बोलायला नको होते. त्यामुळे काश्मिरी मुस्लिमांच्या भावनांना धक्का बसला, असे सईद म्हणाला.
पाकिस्तान जस्टीस पार्टीने २ डिसेंबर रोजी लाहोर उच्च न्यायालयात आयोजित केलेल्या ‘काश्मीरचा प्रश्न आणि भारतातील वाढता हिंदू अतिरेक’ या विषयावरील चर्चासत्रात तो बोलत होता.
काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शरीफ यांनी भारताशी संबंध तोडून टाकावेत, असेही हाफीज सईद म्हणाला. (वृत्तसंस्था)

Web Title: The criticism of Sharif for meeting Modi