शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:37 IST

शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. पेन्सिल्वेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस येथील गेटवे आर्च यांसारखी अनेक प्रमुख पर्यटनस्थळे बंद पडली आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फेडरल सरकारच्या शटडाऊनमुळे आज पहिल्याच दिवशी या देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद पडली असून सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधातील डेमॉक्रॅटिक पार्टी या दोन्ही पक्षांनी त्याचा दोष एकमेकांवर ढकलत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी आणि डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्यातील मतभेदामुळे अमेरिकी संसदेत सरकारी खर्चाचे विधेयक मंजूर होऊ शकलेले नाही.

शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. पेन्सिल्वेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस येथील गेटवे आर्च यांसारखी अनेक प्रमुख पर्यटनस्थळे बंद पडली आहेत. आम्ही फक्त ‘अफोर्डेबल केअर ॲक्ट’अंतर्गत आरोग्य विम्याचे अनुदान सुरू ठेवू इच्छिताे, जेणेकरून सामान्य अमेरिकी कुटुंबांचे प्रीमियम अचानक वाढणार नाहीत, असे डेमॉक्रॅटिक पार्टीने म्हटले आहे.

संघर्षाचा फटका ७.५ लाख कर्मचाऱ्यांना बसणार > या राजकीय संघर्षाचा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. जवळपास ७.५ लाख फेडरल कर्मचारी ‘फर्लो’ रजेवर जाऊ शकतात तसेच काहींना कायमची नोकरी गमवावी लागू शकते.> सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, पर्यावरणाशी निगडित सेवा आणि इतर अनेक क्षेत्रांवर शटडाऊनचा परिणाम होईल. खासगी क्षेत्रालाही धक्का बसेल. > एका अहवालानुसार, मागील महिन्यात खासगी क्षेत्रातील ३२ हजार नोकऱ्या आधीच कमी झाल्या आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांत सोशल मीडियावरही संघर्ष पेटला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Shutdown Cripples Tourism, Sparks Political Blame Game

Web Summary : US shutdown closes landmarks like Liberty Bell, Pearl Harbor Memorial. Republican and Democratic parties blame each other for failed budget. Hundreds of thousands of federal workers face furloughs. Private sector jobs also threatened due to the shutdown's widespread impact.
टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प