शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 16:16 IST

कोरोना संकट काळात अमेरिकेत जायचं असल्यास नियम काय?

प्रश्न- अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत?

उत्तर- विमानानं अमेरिकेत येणाऱ्या नॉन इमिग्रेंट सज्ञान व्यक्तींनी (किमान वयोमर्यादा १८ वर्षे) लसीकरण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. नॉन इमिग्रंट्समध्ये अमेरिकन नागरिक नसलेल्या, कायदेशीर कायमस्वरुपी नागरिक (एलपीआर) किंवा इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेला प्रवास करणाऱ्यांचा समावेश होतो.

६ डिसेंबरपासून सर्व प्रवाशांना, मग त्यांच्या लसीकरणाचं किंवा नागरिकत्वाचं स्टेटस काहीही असो, त्यांना निगेटिव्ह कोविड अहवाल (अमेरिकेत दाखल होण्यापूर्वीच्या एका दिवसातला) किंवा कोविडमध्ये बरे झाल्याची कागदपत्रं दाखवणं गरजेचं आहे. २ वर्षांखालील वयाच्या मुलांना यातून वगळण्यात आलं आहे.

पूर्ण लसीकरणाचे निकष खालीलप्रमाणे आहेत-   

- स्वीकारण्यात आलेल्या सिंगल डोस लसीचा डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) उलटल्यावर.  

- स्वीकारण्यात आलेल्या दोन डोस लसीचा दुसरा डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) झाल्यावर.

- क्लिनिकल ट्रायल सुरू असलेल्या कोविड-१९ लसीचे (प्लासिबो नव्हे) सर्व डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) पूर्ण झाल्यावर.

- फेज ३ क्लिनिकल ट्रायलमध्ये असलेल्या नोवावॅक्स (किंवा कोवोवॅक्स) कोविड-१९ लसीचे (प्लासिबो नव्हे) सर्व डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) पूर्ण झाल्यावर.

- स्वीकारण्यात आलेल्या मिक्स अँड मॅच लसीचे दोन्ही डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) पूर्ण झाल्यावर.

तुम्ही हे निकष पूर्ण करत नसाल, तर तुमचं लसीकरण पूर्ण झालंय असं समजलं जाणार नाही. अशा प्रवाशांना बोर्डिंगपासून रोखण्याचा पूर्ण अधिकार एअरलाईन्सना आहे.

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी एफडीएनं मंजूर केलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापराची परवानगी दिलेल्या लसी ग्राह्य धरल्या जातील. अमेरिकेत प्रवेश देताना कोविशील्ड आणि कोवॅक्सिन ग्राह्य धरण्यात येतील.

जर तुम्हाला फ्ल्यूसारखी लक्षणं असतील किंवा कोरोनाचा संसर्ग झाल्याची शंका तुम्हाला असेल, तर तुम्ही प्रवास १४ दिवसांनी पुढे ढकलावा.  

हे नियम बदलू शकतात ही बाब लक्षात घ्या. प्रवासाबद्दलच्या नियमावलीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया https://in.usembassy.gov/visas/ आणि https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/noncitizens-US-air-travel.html या संकेतस्थळाला भेट द्या.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका