शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 7:54 PM

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने कुठली पावले उचलायला हवीत? फाउची म्हणाले...

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने प्रभावित भारताची स्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटले आहे. तसेच, भारत सरकारला अस्थायी फिल्ड हॉस्पिटल्स तत्काळ तयार करण्यासाठी सैन्य दलासह सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी इतर देशांनाही, भारताला केवळ साहित्याचीच नाही, तर कर्मचाऱ्यांचीही मदत पुरवीण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. (CoronaVirus top us health expert advises india deal with second wave of covid 19)

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

भारतातील सध्य स्थितीसंदर्भात काय वाटते, यावर फाउची म्हणाले, भारताची स्थिती अत्यंत गंभीर आहे. हे स्पष्टच आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ तेथील संक्रमण दर फार अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित हेत असल्याने सर्वांकडे पुरेसे लक्ष देणे कठीण आहे. रुग्णालयांत बेड, ऑक्सिजन आणि इतर साहित्याची कमतरता असणे, ही अत्यंत निराशाजनक स्थिती असते. हे पाहता संपूर्ण जगाने शक्य ती सर्व प्रकारची मदत करायला हवी, असे आम्हाला वाटते. स्वतः भारतही अशी पावले उचलू शकतो. जेणे करून भारताला या परिस्थितीचा सामना करता येईल.

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने कुठली पावले उचलायला हवी, यावर फाउची म्हणाले, मला वाटते, की काही गोष्टी तत्काळ केल्या जाऊ शकतात. काही पावले, कमी, मध्यम आणि काही दीर्घ काळासाठी उचलले जाऊ शकतात. सर्वप्रथम जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस द्यायला हवी. मग ती लस भारताची असो अथवा इतर कुण्या देशाची. 

CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

मात्र, केवळ लसीकरणाने सध्याची समस्या सुटणार नाही. यामुळे आपल्याला काही आठवड्यांत समस्येला आळा घालण्यास मदत मिळेल. यामुळे ही मध्यम अथवा दीर्घकालीन कृती आहे. मात्र, आता आवश्यकता आहे, ती तत्काळ पावले उचलण्याची, ती भारत आधीपासूनच उचलत आहे, हे मला माहीत आहे. 

लॉकडाउन लावावा -भारतातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. माझा सल्ला आहे, की आपण संपूर्ण देशातच लॉकडाउन लावावा. गेल्या वर्षी चीननेही असेच केले होते. एवढेच नाही, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि काही इतर देशांनीही असेच केले होते. त्यांनीही एका ठरावीक काळासाठी संपूर्ण लॉकडाउन लावला होता. आपल्याला सहा महिन्यांच्या लॉकडाउनची गरज नाही. आपण काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन लाऊ शकतात. इतर देशांच्या अनुभवावरून हे स्पष्ट आहे, की लॉकडाउनमुळे संक्रमणाचा दर कमी होतो आणि संक्रमण चेन तुटते. तसेच युद्धाच्या वेळी तयार केली जातात, तशी फिल्ड हॉस्पिटल्सदेखील तातडीने उभारायला हवीत. यासाठी लष्कराची मदत घ्यायला हवी. जेणेकरून गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होती. असेही फाउची म्हणाले.

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSoldierसैनिकIndiaभारतhospitalहॉस्पिटलAmericaअमेरिका