CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:13 PM2021-05-04T15:13:59+5:302021-05-04T15:16:29+5:30

ही संपूर्ण मदत विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील.

CoronsVirus Israel is sending life saving equipment to get india out of the corona crisis | CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून भारताला बाहेर काढण्यासाठी जगभरातील देशांकडून भारताला मदत मिळत आहे. यातच आता ईस्रायलदेखील याच आठवड्यात भारताला लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहे. भारतात पाठविल्या जात असलेल्या या उपकरणांत ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रसचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील. (CoronaVirus  Israel is sending life saving equipment to get india out of the corona crisis)

संकट काळात इस्रायल भारतासोबत -
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांनी म्हटले  आहे, की भारत, इस्रायलचा सर्वात जवळचा आणि महत्वाचा मित्र आहे. दोन्ही देशांतील घट्ट मैत्रीचा हवाला देत परराष्ट्रमंत्री म्हणाले, भारत आणि इस्रायल यांच्यात अनेक प्रकारचे राजकीय, संरक्षण आणि आर्थिक स्वरुपाचे करार आहेत. या कठीण काळात आम्ही पूर्णपणे भारतासोबत उभे आहोत. आम्ही आमच्या भारतीय भाऊ आणि बहिणींसाठी लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहोत. 

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

अश्केनजी यांनी, या कार्यात सहकार्य करणारे लोक इस्रायलमधील मुख्य आर्थिक संस्था, जसे इस्रायल-भारत चेम्बर ऑफ कॉमर्स, इस्रायल-एशिया चेम्बर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इस्रायल, फेड्रेशन ऑफ इस्रायल चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्यासाठीही आभार मानले आहेत.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारतानंही केली होती इस्रायलला मदत -
इस्रायलमधील मुख्य संघटना JDC (American Jewish Joint Distribution Committee) देखील भारताला होत असलेल्या मदतीच्या प्रयत्नात सहभागी आहे आणि ऑक्सिजन जनरेटर्ससह इतर काही उपरकणे भारतात पाठवत आहे. इस्रायलने जारी केलेल्या एका निवेदनात, गेत वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारताने इस्रायलला केलेल्या मदतीचा उल्लेख करत म्हणण्यात आले आहे, की "आम्हाला आठवते, गेल्या वर्षी भारताने कोरोनो व्हायरस संकटाच्या सुरुवातीला, इस्रायलच्या मदतीसाठी कशा प्रकारे मास्क, हँड ग्लोव्हज औषधांसाठी कच्च्या मालासह अनेक गोष्ट्रींच्या एअर डिलिव्हरीला मंजुरी दिली होती आणि इस्रायली नागरिक सुरक्षित पोहोचण्यासाठीही मदत केली होती."

CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

रशियानंही पाठवलीय मदत - 
जगभरात भारताचा जिगरी मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियानेही भारताच्या मदतीसाठी नुकतीच दोन विमानं पाठविली आहेत. ही दोन्ही विमानं दिल्ली एअरपोर्टवर उतरली होती. रशियाने या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर ऑषध पाठवले. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विट करत माहिती दिली होती.

Web Title: CoronsVirus Israel is sending life saving equipment to get india out of the corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.