CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:09 PM2021-04-28T14:09:25+5:302021-04-28T14:20:55+5:30

18 वर्षांच्या वरील लोकांना आजपासून कोरोना लशीसाठी नोंदणी करायची आहे. यासंदर्भातील अमेरिकेतील लशीचे सर्वात मोठे तज्ज्ञ तसेच अमेरिकन राष्ट्रपतींचे चीफ मेडिकल अॅडव्हायझर डॉक्टर अँथनी फाउची यांचे म्हणणे सर्वांनी वाचायला आणि ऐकायला हवे. (why you should register for corona vaccine)

कोरोना लस घेण्याची आपल्याला भीती वाटत असेल अथवा ती घेण्यात आपण टाळाटाळ करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी आहे. यासाठी 18 वर्षांच्या वरील लोकांना आजपासून लशीसाठी नोंदणी करायची आहे. यासंदर्भातील अमेरिकेतील लशीचे सर्वात मोठे तज्ज्ञ तसेच अमेरिकन राष्ट्रपतींचे चीफ मेडिकल अॅडव्हायझर डॉक्टर अँथनी फाउची यांचे म्हणणे सर्वांनी वाचायला आणि ऐकायला हवे. (CoronaVirus why you should register for corona vaccine know what anthony fauci and experts are saying)

फाउची यांनी म्हटले आहे, की भारतात तयार झालेली कोव्हॅक्सीन कोरोनाच्या 617 प्रकारच्या व्हेरिएंट्स म्हणजेच प्रकारांचा खत्मा करू शकते. एवढेच नाही तर, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन कोरोनाविरोधात कशाप्रकारे प्रभावशाली आहे, यावर भारतात करण्यात आलेल्या एका अभ्यासानेही शिक्का मोर्तब केले आहे.

लस 617 व्हेरिएंट्सवर प्रभावी - एका कॉन्फ्रन्सिंग कॉलवर प्रश्नांना उत्तर देताना फाउची म्हणाले,' भारतात लस घेत असलेल्या लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात ही लस कोरोनाच्या 617 व्हेरएंट्सवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. सध्या भारत ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे, त्यात लस एक अत्यंत प्रभावी अँटिडॉटच्या स्वरूपात काम करू शकतो.

संक्रमणाच्या काळात सामान्य स्वरुपाची लक्षणं - भारतातील कोरोना विरोधातील लसिकरणात सध्या वापरल्या जाणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या लशी कोरोनाच्या ‘भारतीय स्वरूपा’विरोधात अत्यंत प्रभावी आहेत. तसेच लसीकरणानंतर संक्रमणाच्या स्थितीत ‘‘सामान्य’’ लक्षणं समोर येतात. 'सीएसआयआर'अंतर्गत येणाऱ्या जिनोमिक्स आणि आयजीआयबीचे प्रमुख अनुराग अग्रवाल यांनी एका अभ्यासाच्या सुरुवातीच्या परिणामांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

यात सांगण्यात आले आहे, की सार्स-कोव-2 के बी.1.617 स्वरूपावर लशींच्या प्रभावाच्या आकलनावरू समजते, की लसीकरणानंतर संक्रमण झाल्यास आजाराचे लक्षण सौम्य असतात.

व्हायरस विरोधात दोन्ही लशी प्रभावी - कोरोना व्हायरसच्या बी.1.617 रूपाला भारतीय रूप अथवा ‘डबल म्यूटेंट रूप’ही म्हटले जाते. या अध्यनातून व्हायरसच्या या रुपावर भारतात वापरल्या जात असलेल्या दोन्ही लशी प्रभावी असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन अनिवार्य - देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच बुधवारपासून 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना लस देण्यासंदर्भात रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील लोकांना लशीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंधनकारक केले आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू होईल.

गर्दीपासून बचावासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन 18 वर्षांच्या वरील लोकांसाठी लसीकरण अभियान सुरू केल्यानंतर लसीकरण केंद्रांवर रजिस्ट्रेशन केले असते, तर मोटी गर्दी उडाली असती आणि ही गर्दी नियंत्रित करणे आव्हानात्मक ठरले असते. यामुळे सरकारने 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन अनिवार्य केले आहे.

कोविन अॅपबरोबरच आरोग्य सेतूवरही रजिस्ट्रेशन - 18 वर्षांहून अधिक वय असलेल्यांना लस घेण्यासाठी Co-WIN अॅपबरोबरच आरोग्‍य सेतू अॅपवरही रजिस्‍ट्रेशन करता येणार आहे. Aarogya Setu App वर जावून आपल्याला आपले लसीकरण केंद्रही निवडता येईल.

असं करा रजिस्टेशन - सर्वप्रथम अॅपवर जा, आपला मोबाईल नंबर टाका. यानंतर एक OTP येईल. OTP टाकून अपले अकाउंट तयार करा. नाव, वय, लिंग टाका आणि एक ओळख पत्र (आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, जसे फोटो आयडी )अपलोड करा. यानंतर लसीकरण केंद्र आणि तारीख निवडा. एक व्यक्ती आपल्या आयडीने केवळ आपलेच रडिस्ट्रेशन करू शकतो. यापूर्वी एका आयजीवर 4 जणांचे रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा होती.