CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:54 PM2021-05-04T19:54:57+5:302021-05-04T19:56:24+5:30

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने कुठली पावले उचलायला हवीत? फाउची म्हणाले...

CoronaVirus top us health expert advises india deal with second wave of covid 19 | CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

Next

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने प्रभावित भारताची स्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटले आहे. तसेच, भारत सरकारला अस्थायी फिल्ड हॉस्पिटल्स तत्काळ तयार करण्यासाठी सैन्य दलासह सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी इतर देशांनाही, भारताला केवळ साहित्याचीच नाही, तर कर्मचाऱ्यांचीही मदत पुरवीण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. (CoronaVirus top us health expert advises india deal with second wave of covid 19)

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

भारतातील सध्य स्थितीसंदर्भात काय वाटते, यावर फाउची म्हणाले, भारताची स्थिती अत्यंत गंभीर आहे. हे स्पष्टच आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ तेथील संक्रमण दर फार अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित हेत असल्याने सर्वांकडे पुरेसे लक्ष देणे कठीण आहे. रुग्णालयांत बेड, ऑक्सिजन आणि इतर साहित्याची कमतरता असणे, ही अत्यंत निराशाजनक स्थिती असते. हे पाहता संपूर्ण जगाने शक्य ती सर्व प्रकारची मदत करायला हवी, असे आम्हाला वाटते. स्वतः भारतही अशी पावले उचलू शकतो. जेणे करून भारताला या परिस्थितीचा सामना करता येईल.

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने कुठली पावले उचलायला हवी, यावर फाउची म्हणाले, मला वाटते, की काही गोष्टी तत्काळ केल्या जाऊ शकतात. काही पावले, कमी, मध्यम आणि काही दीर्घ काळासाठी उचलले जाऊ शकतात. सर्वप्रथम जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस द्यायला हवी. मग ती लस भारताची असो अथवा इतर कुण्या देशाची. 

CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

मात्र, केवळ लसीकरणाने सध्याची समस्या सुटणार नाही. यामुळे आपल्याला काही आठवड्यांत समस्येला आळा घालण्यास मदत मिळेल. यामुळे ही मध्यम अथवा दीर्घकालीन कृती आहे. मात्र, आता आवश्यकता आहे, ती तत्काळ पावले उचलण्याची, ती भारत आधीपासूनच उचलत आहे, हे मला माहीत आहे. 

लॉकडाउन लावावा -
भारतातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. माझा सल्ला आहे, की आपण संपूर्ण देशातच लॉकडाउन लावावा. गेल्या वर्षी चीननेही असेच केले होते. एवढेच नाही, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि काही इतर देशांनीही असेच केले होते. त्यांनीही एका ठरावीक काळासाठी संपूर्ण लॉकडाउन लावला होता. आपल्याला सहा महिन्यांच्या लॉकडाउनची गरज नाही. आपण काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन लाऊ शकतात. इतर देशांच्या अनुभवावरून हे स्पष्ट आहे, की लॉकडाउनमुळे संक्रमणाचा दर कमी होतो आणि संक्रमण चेन तुटते. तसेच युद्धाच्या वेळी तयार केली जातात, तशी फिल्ड हॉस्पिटल्सदेखील तातडीने उभारायला हवीत. यासाठी लष्कराची मदत घ्यायला हवी. जेणेकरून गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होती. असेही फाउची म्हणाले.

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

Web Title: CoronaVirus top us health expert advises india deal with second wave of covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.