शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 10:59 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 88,507 बळी  घेतले आहेत.

जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 308,645 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 46 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 4,628,724 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,759,589 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 88,507 बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 31 हजार, 610 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 27 हजार 459 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 27 हजार 529 जणांचा तर ब्रिटनमध्ये 33 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना साथीवर उपचार करण्याकरिता संशोधनातून तयार केलेली औषधे येत्या काही महिन्यांत उपलब्ध होतील तसेच या आजारावरील लसीला पुढच्या वर्षी 2021 मध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असे युरोपियन मेडिसिन एजन्सीने म्हटले आहे. या संस्थेच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. मार्को कावलेरी यांनी सांगितले की, कोरोनावरील उपचारांकरिता तयार केलेल्या औषधांना मान्यता देण्याची प्रक्रिया यंदाच्या उन्हाळ्यानंतर पार पडेल. रेमडिसिव्हिर या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते असे त्यासंदर्भात केलेल्या चाचण्यांमध्ये दिसून आले होते. मात्र या औषधाबाबत आणखी संशोधन होणे बाकी आहे.

ते म्हणाले की, कोणतीही लस शोधून काढण्यासाठी काही वर्षे जातात. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यातील काही जणांनी तयार केलेली लस रुग्णांना टोचल्यानंतर रोग हटविण्यासाठी ती प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मात्र या लसीबाबतचे सर्व प्रयोग पूर्ण झाल्यानंतर जो निष्कर्ष हाती येईल, तोच अत्यंत महत्त्वाचा असतो. कोरोना प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाची लस शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही, असेही डॉ. मार्को कावलेरी म्हणाले. (वृत्तसंस्था)

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा

'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी

CoronaVirus News : '...म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची'; मोदींसोबतच्या चर्चेनंतर बिल गेट्स यांचं ट्विट

प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाItalyइटलीFranceफ्रान्सDeathमृत्यू